शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

CoronaVirus News : लॉकडाउन निर्बंधाचे कडक पालन करा; केंद्राच्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 06:12 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : ही स्थिती धोकादायक असून राज्यांनी लॉकडाऊनच्या नियमांची कठोर अंमलबजावणी करावी, असे केंद्राने बजावले आहे.

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातही निर्बंधांची नीट अंमलबजावणी होत नसल्याचे लक्षात आल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना पुन्हा एकदा सावध केले आहे. काही ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे, तर काही ठिकाणी बाजारपेठा खुल्या करण्यात आल्या आहेत. ही स्थिती धोकादायक असून राज्यांनी लॉकडाऊनच्या नियमांची कठोर अंमलबजावणी करावी, असे केंद्राने बजावले आहे.केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठविलेल्या एका पत्रात म्हटले आहे की, लॉकडाऊनच्या काळात केंद्राने लागू केलेले निर्बंध शिथील करण्याचा राज्य सरकारांना अधिकार नाही. कोरोना साथीची विविध झोनमधील स्थिती पाहून तेथे हवे तर, आणखी निर्बंध राज्य सरकार लादू शकते. कोरोना साथीच्या स्थितीवर राज्यांनी बारीक लक्ष ठेवावे. त्यांनी म्हटले आहे की, लॉकडाऊनच्या काळात कोणत्या गोष्टींचे पालन करायचे आहे; हे निश्चित करून त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात यावेत. लोकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, याची दक्षता बाळगत केंद्रीय गृह खाते व राज्यांनी दिलेल्या आदेशांचे पालन झाले पाहिजे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी नव्या आदेशासंदभार्तील पत्रक केंद्रीय गृह खात्याने रविवारी रात्री जारी केले. त्यामध्ये म्हटले आहे की, कोरोना साथीचा झालेला फैलाव लक्षात घेता राज्यांनीच रेड, आॅरेंज, ग्रीन झोन कोणते, हे निश्चित करावे. त्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आखून दिलेल्या निकषांचे पालन करावे. जिथे कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाला आहे; अशा भागांमध्ये वैद्यकीय व अन्य अत्यावश्यक सेवा वगळता बाकीच्या सर्व गोष्टी व व्यवहारांवर तात्पुरती बंदी घाला. लॉकडाऊनमुळे अडकलेले स्थलांतरित मजूर, यात्रेकरू, विद्यार्थी, पर्यटक व अन्य लोकांना गावी जायला विशेष रेल्वे तसेच बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे....तर साथीला निमंत्रणलॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याला सोमवारी सुरूवात झाल्यानंतर विविध राज्यांत काही ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती; तर काही ठिकाणी मंडई, बाजारपेठा पुन्हा उघडण्यात आल्या. मात्र अशा ठिकाणी लोकांची मोठी गर्दी झाली, तर ते कोरोना साथीच्या फैलावाला आमंत्रण दिल्यासारखेच होईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHome Ministryगृह मंत्रालय