शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: पंतप्रधान मोदी आज रात्री देशवासीयांशी संवाद साधणार; मोठी घोषणा होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 12:39 IST

CoronaVirus News पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे देशाचं लक्ष

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा १७ मे रोजी संपतो आहे. मात्र कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी आज काय बोलणार, कोणती मोठी घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कोरोना संकटातून मार्ग काढण्याच्या दृष्टीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. देशात लागू असलेला लॉकडाऊनचा तिसरा टप्पा १७ मे रोजी संपणार आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झालेली चर्चा आणि त्या चर्चेचा एकंदर सूर पाहता देशातला लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. त्याची घोषणा पंतप्रधान मोदी आज करू शकतात. लॉकडाऊनच्या पहिल्या तीन टप्प्यांपेक्षा चौथा टप्पा वेगळा असेल, अशी चर्चा आहे. यामध्ये राज्य सरकारांना अधिकचे अधिकार मिळू शकतात.

काल पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना सहा तास मॅरेथॉन बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या समस्या आणि लॉकडाऊनबद्दलची मतं मांडली. महाराष्ट्र, पंजाब, पश्चिम बंगाल आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली. तर अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केवळ रेड झोन आणि कंटेनमेंट झोनमधील निर्बंध वाढवण्याचं मत मांडलं.

लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाल्यास आर्थिक व्यवहारांना सवलती मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सध्या लागू असलेले बरेचसे नियम बदलतील. याशिवाय राज्यांचे अधिकार वाढवले जाऊ शकतात. चौथ्या टप्प्यातल्या लॉकडाऊनचे नियम ठरवण्याचा अधिकार राज्यांना मिळू शकतो. या बैठकीत मोदींनी जन ने जग तक ही नवी घोषणा दिली.

या बैठकीत पंतप्रधानांनी राज्यांकडे पुढे नेमकं काय करणार याबद्दलचे आराखडे मागितले. लॉकडाऊन उठवण्यासाठी, आर्थिक व्यवहार सुरू ठेवण्यासाठी आणि ग्रीन-रेड-ऑरेंज झोनशी संबंधित सूचना मोदींनी मागितल्या. झोन निश्चित करण्याचे अधिकार राज्य सरकारांना देण्यात यावेत, अशी मागणी यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली. लॉकडाऊनशिवाय पुढे जाणं खूप अवघड असल्याचं मत यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मांडलं.

देशातील लॉकडाऊन आणखी वाढण्याची शक्यता; पण आता बरंच काही बदलणार?आता परिवहन मंत्री अनिल परब यांना सरकार अटक करणार का?; भाजपाचा सवाललॉकडाऊन वाढवणं अर्थव्यवस्थेसाठी आत्मघातकी ठरेल- आनंद महिंद्राचिनी हॅकर्सकडून कोरोनाच्या संशोधनासंबंधी माहिती चोरण्याचा प्रयत्न, अमेरिकेचा गंभीर आरोप

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी