शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

"आताचं संकट मोदींना झेपणारं नाही; त्यांनी सर्वपक्षीय सरकार स्थापन करावं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 10:29 IST

विस्टन चर्चिल यांच्याप्रमाणे सर्वपक्षीय सरकार स्थापन करण्याचा काटजूंचा सल्ला

नवी दिल्ली: आपल्या रोखठोक मतांसाठी ओळखले जाणारे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी देशातील सद्यस्थितीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. कोरोनामुळे देशासमोर मोठं संकट उभं ठाकलं आहे. आता परिस्थिती मोदींच्या नियंत्रणात नाही. या संकटाचा सामना करणं एकट्या मोदींना झेपणार नाही. त्यामुळे त्यांनी इंग्लंडचे माजी पंतप्रधान विस्टन चर्चिल यांचं अनुकरण करावं, असा सल्ला काटजू यांनी दिला. देशातील कोरोनाचं संकट, रुग्णांची वाढती संख्या या पार्श्वभूमीवर काटजू यांनी 'द वीक'साठी एक लेख लिहिला आहे. 'देशासमोरील समस्या खूप मोठी आहे. या समस्येला एकटे मोदी आणि भाजपा तोंड देऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी एक राष्ट्रीय सरकार स्थापन करावं. या सरकारमध्ये सर्वपक्षीय नेते, वैज्ञानिक, प्रशासकीय तज्ज्ञांचा समावेश असावा,' असा सल्ला काटजू यांनी दिला आहे. काटजूंनी त्यांच्या लेखात लेखात चर्चिल यांचं उदाहरण दिलं आहे. 'इंग्लंडचे माजी पंतप्रधान विस्टन चर्चिल यांनी मे १९४० मध्ये राष्ट्रीय सरकार स्थापन केलं होतं. त्यावेळी इंग्लंडसमोर नाझी जर्मनीनं आव्हान उभं केलं होतं. त्यामुळे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात चर्चिल यांनी सर्वपक्षीय सरकार स्थापन केलं. त्यामुळे इंग्लंडच्या संसदेत विरोधी पक्षच नव्हता. कारण विरोधी पक्षालादेखील सरकारमध्ये स्थान देण्यात आलं होतं,' असं काटजूंनी लेखात म्हटलं आहे.चर्चिल पंतप्रधान असताना त्यांच्यासमोर जर्मनीचं संकट होतं. तसा परकीय आक्रमणाचा कोणताही धोका आपल्यासमोर नाही. पण कोरोनाचा संकट तितकंच गंभीर असल्याचं काटजूंनी लिहिलं आहे. 'देशासमोर मोठी गंभीर समस्या आहे. एकटे मोदी किंवा भाजपा या समस्येशी दोन हात करू शकत नाहीत. अर्थव्यवस्था अडचणीत सापडली असून कोरोनानं परिस्थिती आणखी बिकट झाली आहे,' असं मत काटजूंनी व्यक्त केलंय....म्हणून जवान मोठ्या संख्येनं सोडताहेत हवाई दल; सर्वेक्षणातून चिंताजनक माहिती समोर 

गिलगिट-बाल्टिस्‍तानवर भारताच्या 'मास्‍टरस्‍ट्रोक'ला सिक्कीममधील संघर्षातून चिनी उत्तर, तज्ज्ञांचा दावाड्रॅगन संपूर्ण एव्हरेस्ट गिळंकृत करायच्या मार्गावर; नेपाळनं उठवला आवाज

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी