शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : दिल्लीत प्लाझ्मा बँक सुरू होणार, मुख्यमंत्र्यांनी लोकांना केलं 'हे' महत्त्वपूर्ण आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 13:56 IST

लवकरच दिल्लीमध्ये प्लाझ्मा बँक सुरू करण्यात येणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी यासंदर्भात घोषणा केली.

ठळक मुद्देदिल्लीतील आयएलबीएस रुग्णालयात प्लाझ्मा बँक तयार करण्यात येईल.दिल्ली सरकारच्या प्लाझ्मा बँकेच्या सर्व औपचारिकता पूर्ण झाल्या आहेत.कोणालाही प्लाझ्मा वैयक्तिकरित्या मिळणार नाही.

नवी दिल्ली : दिल्लीत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लवकरच दिल्लीमध्ये प्लाझ्मा बँक सुरू करण्यात येणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी यासंदर्भात घोषणा केली. "आम्ही काही महिन्यांपूर्वी याची चाचणी सुरू केली होती आणि त्याचा परिणाम सकारात्मक आहे," अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.

प्लाझ्मा चाचणीचा सकारात्मक परिणाम दिसून आल्यामुळे राज्य सरकारने प्लाझ्मा बँक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील आयएलबीएस रुग्णालयात प्लाझ्मा बँक तयार करण्यात येईल. तसेच,  कोरोना रूग्णांसाठी प्लाझ्मा दान करण्यासाठी लोकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.

अरविंद केजरीवाल म्हणाले, "दिल्ली सरकारच्या प्लाझ्मा बँकेच्या सर्व औपचारिकता पूर्ण झाल्या आहेत. याचा फायदा प्रत्येकाला मिळेल. सर्व रूग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांना, मग सरकारी असोत किंवा खाजगी, याचा सर्वांना लाभ मिळेल. जर एखाद्यास प्लाझ्मा आवश्यक असेल तर डॉक्टरांनी सांगितल्यानंतरच रुग्णाला प्लाझ्मा मिळू शकेल. तसेच, कोणालाही प्लाझ्मा वैयक्तिकरित्या मिळणार नाही. आयएलबीएस हॉस्पिटलमध्ये प्लाझ्मा बँक पुढील दोन दिवसांत सुरू केली जाईल."

याचबरोबर, अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील कोरोना संसर्गाच्या उपचारातून बरे झालेले रुग्ण आणि सामान्य लोकांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले आहे. कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सर्व लोकांनी पुढाकार घेणे, आवश्यक आहे, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. तसेच, बर्‍याच हॉस्पिटलमधील रूग्णांना प्लाझ्मा देण्याचे उदाहरण देताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, या कामात सर्वांनी भाग घ्यावा.

आयएलबीएस रुग्णालय कोरोना रुग्णालय नाही, तरीही तेथे व्यवस्था करण्यात आली आहे. जर कोणाला प्लाझ्मा दान करायचे असेल तर त्यांनी सरकारला सांगावे. त्या व्यक्तीला आयएलबीएस रुग्णालयात पोहोचवण्याची सर्व जबाबदारी सरकार घेईल. यासाठी, एक किंवा दोन दिवसांत फोन नंबर जारी केले जातील. या क्रमांकावर कॉल केल्यावर, एक टॅक्सी आपल्यापर्यंत पोहोचेल आणि आपल्याला आयएलबीएस रुग्णालयात घेऊन जाईल, ज्याठिकाणी आपण प्लाझ्मा दान करण्यास सक्षम असाल, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. याशिवाय, अधिकाधिक लोकांनी प्लाझ्मा दान करावे, जेणेकरुन कोरोनाग्रस्त रूग्णांवर उपचार करण्यास मदत होईल, असे आवाहनही अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याArvind Kejriwalअरविंद केजरीवालNew Delhiनवी दिल्ली