शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : केवळ बचाव नव्हे, हमखास गुण; कोरोनावर पतंजलीची आयुर्वेदिक औषधे रामबाण ठरत असल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 05:49 IST

हे औषध सात दिवसांत सर्व पतंजलीच्या दुकानांमध्ये उपलब्ध होईल, असे जाहीर करण्यात आले.

डेहराडून : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे होणाऱ्या ‘कोविड-१९’ या आजारावर ‘अत्यंत गुणकारी’ आयुर्वेदिक औषध बाजारात आणल्याची घोषणा ऋषिकेश येथील पतंजली योगपीठ या कंपनीने मंगळवारी केली. हे औषध सात दिवसांत सर्व पतंजलीच्या दुकानांमध्ये उपलब्ध होईल, असे जाहीर करण्यात आले.योगगुरू बाबा रामदेव आणि पतंजली कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आचार्य बालकृष्णन यांनी पत्रकार परिषदेत असा दावा केला की, ‘कोरोनिल‘व ‘श्वासारी’ नावाच्या या औषधांनी रुग्णाची केवळ रोगप्रतिकारशक्तीच वाढत नाही, तर त्याचा ‘कोविड-१९’ आजारही त्याने हमखास बरा होतो. या औषधाने कोविड-१९’चे रुग्ण तीन ते सात दिवसांत पूर्ण बरे झाले आहेत. रुग्णांवर घेतलेल्या (पान ९ वर)(पान १ वरून) चाचण्यांमध्ये या औषधाने नक्की गुण येतो हे १०० टक्के सिद्ध झाले. जग या महामारीशी लढत असताना हे औषध उपलब्ध करून देताना अतिशय आनंद होत आहे, असे बाबा रामदेव म्हणाले. या औषधात पिपली, अश्वगंधा, तुळस, काळी मिरी, काकडशिंगी, दालचिनी हे घटक आहेत.या औषधांसह कंपनीने कोरोना किट तयार केले आहे. ५४५ रुपये किंमतीचे हे किट ३० दिवसांच्या उपचारांसाठी आहे. आचार्य बालकृष्णन म्हणाले की, देशभरातील सर्व पतंजली स्टोअर्समध्ये येत्या आठवडाभरात हे किट विक्रीसाठी उपलब्ध होईल. लोकांना आॅनलाईन मागणी नोंदवून घरपोच औषध मागविता यावे यासाठी एक अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपही विकसित करण्यात येत आहे.बाबा रामदेव म्हणाले की, पतंजलीचे स्वत:चे संशोधन केंद्र व निझाम इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस यांनी मिळून हे औषध विकसित केले आहे. दिल्ली व अहमदाबाद या शहरांत या औषधांच्या कोरोनाबाधित रुग्णांवर सर्वप्रथम चाचण्या घेण्यात आल्या. त्यात २८० रुग्ण पूर्ण बरे झाले. औषधांमुळे कोणतीही गुंतागुंत निर्माण झाली नाही व मुख्य म्हणजे सर्वांचे मृत्यू टळले. (वृत्तसंस्था)>औषधाची जाहिरातकरण्यास मनाईपरंतु केंद्रीय आयुष मंत्रालयाने पतंजली कंपनीस याची जाहिरात करण्यास मनाई केली. या औषधाला १९५४ चा चमत्कारी औषधांच्या जाहिरातीस प्रतिबंध करणारा कायदा लागू होत असल्याने हे औषध या कायद्याच्या कक्षेत बसणारे आहे वा नाही याची शहानिशा होईपर्यंत याची जाहिरात करू नये, असे मंत्रलयाने म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या