शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus News: कोरोना रुग्ण आणि मृतांच्या संख्येत रोज मोठी वाढ; २६ लाख उपचाराधीन रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 06:41 IST

२६ लाख उपचाराधीन रुग्ण; बरे झाले १ कोटी ४० लाख

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्ण व मृतांच्या संख्येत दररोज सतत वाढच होत आहे. रविवारी कोरोनाचे सुमारे साडेतीन लाख नवे रुग्ण आढळून आले तर २७६७ जणांचा बळी गेला. सध्या देशात कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या २६ लाखांहून अधिक असून १ कोटी ४० लाख लोक या संसर्गातून बरे झाले.

केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार,  देशामध्ये सलग चौथ्या दिवशी तीन लाखांहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. रविवारी कोरोना आजारातून २ लाख १७ हजार जण बरे झाले आहेत.

देशातील कोरोना बळींची एकूण संख्या १ लाख ९२ हजार  झाली आहे. उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या १५.८२ टक्के इतकी आहे. कोरोनाच्या वाढत्या साथीमुळे लसीकरणही वेगाने केले जात आहे. देशात आतापर्यंत १४ कोटींहून अधिक लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. 

जगभरात कोरोना रुग्णांची संख्या १४ कोटी ७१ लाख असून त्यातील १२ कोटी ४७ लाख लोक बरे झाले आहेत. तसेच ३१ लाख लोकांचा बळी गेला आहे.  जगामध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या अमेरिकेमध्ये ३ कोटी २७ लाख कोरोना रुग्ण असून त्यातील २ कोटी ५३ लाख जण बरे झाले तर ५ लाख ८५ हजार जणांचा बळी गेला. या देशात ६८ लाख उपचाराधीन रुग्ण आहेत. ब्राझिलमध्ये कोरोना बळींची संख्या ३ लाख ८९ हजार असून ती भारतापेक्षा जास्त आहे. 

देशात आतापर्यंतचे सर्वाधिक नवे कोरोना रुग्ण शनिवारी सापडले. कोरोना रुग्णांच्या अधिकृत आकडेवारीपेक्षा भारतात कितीतरी अधिक पटीने रुग्ण असण्याची शक्यता आहे. वैद्यकीय तज्ज्ञ व नागरिकांनाही तसेच वाटते, असे ब्रिटनमधील ‘गार्डियन’ या वृत्तपत्राने शनिवारी म्हटले आहे.

ग्रामीण भागात कमी जागरूकता 

कोरोनाचा संसर्ग होऊनही चाचणी न झालेले अनेक लोक भारतात असण्याची शक्यता असल्याचे मत ‘गार्डियन’च्या वृत्तात व्यक्त करण्यात आले आहे. झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाच्या लक्षणांबाबत अद्याप फारशी जागरूकता दिसत नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत