शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : देशात कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली ४ लाख ४0 हजारांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 04:09 IST

जगातील एकूण रुग्णांचा आकडा मंगळवारी दुपारपर्यंत ९२ लाख ८ हजारांच्यावर गेला होता.

नवी दिल्ली : गेल्या २४ तासांमध्ये देशाच्या विविध भागांत कोरोनाचे १४ हजार ९९३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील आतापर्यंतच्या रुग्णांचा आकडा ४ लाख ४0 हजार २१५ झाला आहे. जगात सर्वाधिक म्हणजे २३ लाख ८८ हजार रुग्ण एकट्या अमेरिकेमध्ये आहेत. जगातील एकूण रुग्णांचा आकडा मंगळवारी दुपारपर्यंत ९२ लाख ८ हजारांच्यावर गेला होता.भारतात आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांतील २ लाख ४८ हजार १८९ रुग्ण बरे होऊ न घरी परतले आहेत. गेल्या २४ तासांमध्येच १0 हजार ९९४ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी जाण्याची परवानगी देण्यात आली, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सकाळी दिली. भारतात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ५६. ३८ टक्के झाले आहे. सध्या १ लाख ७६ हजार १४ रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. आतापर्यंत कोरोनाने देशात १४ हजार ११ जण मरण पावले आहेत. त्यात गेल्या २४ तासांमध्ये मरण पावलेल्या ३१२ जणांचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार २४ तासांत मरण पावलेल्या ३१२ जणांमधील ११३ जण महाराष्ट्रातील तर ५८ जण दिल्लीमधील आहेत. तमिळनाडूमध्ये कोरोनाने २४ तासांत २१, तर गुजरातमध्ये १९ जणांचा बळी घेतला.>महाराष्ट्र, दिल्ली, तमिळनाडू , गुजरातमध्ये गंभीर स्थितीमहाराष्ट्र, दिल्ली, तमिळनाडू व गुजरात या चार राज्यांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद या महानगरांत अधिक रुग्ण आढळून येत आहेत. या चार महानगरांतून लाखो परप्रांतीय मजूर गेल्या महिनाभरात आपापल्या राज्यांत, गावी निघून गेले. त्यामुळे तिथेही कोरोनाचा फैलाव होईल, अशी भीती व्यक्त होत होती. पण बिहार, उत्तर प्रदेश, ओडिशा, झारखंड, मध्य प्रदेश आदी राज्यांत तसे घडल्याचे दिसत नाही. या राज्यांमधील मोठ्या शहरांतच कोरोनाची लागण वेगाने होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या