CoronaVirus News : ऑक्टोबर महिन्यात नवे रुग्ण, बळींच्या संख्येत सुमारे ३०% घट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2020 02:09 AM2020-11-02T02:09:48+5:302020-11-02T06:57:01+5:30

CoronaVirus News: केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांची एकूण संख्या ८१,८४,०८२ तर बरे झालेल्यांचा आकडा ७४,९१,५१३ इतका आहे.

CoronaVirus News: New patients in October, the number of victims decreased by about 30% | CoronaVirus News : ऑक्टोबर महिन्यात नवे रुग्ण, बळींच्या संख्येत सुमारे ३०% घट

CoronaVirus News : ऑक्टोबर महिन्यात नवे रुग्ण, बळींच्या संख्येत सुमारे ३०% घट

Next

नवी दिल्ली : देशात सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात कोरोनाचे नवे रुग्ण व बळींच्या संख्येत सुमारे ३० टक्के घट झाली आहे. रविवारी कोरोनाचे ४६,९६३ नवे रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णसंख्या ८१ लाख ८४ हजारांवर पोहोचली आहे. आतापर्यंत ७४ लाख ९१ हजार जण या संसर्गातून बरे झाले असून त्यांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत ९१.५४ टक्के आहे.
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांची एकूण संख्या ८१,८४,०८२ तर बरे झालेल्यांचा आकडा ७४,९१,५१३ इतका आहे. रविवारी कोरोनामुळे आणखी ४७० जण मरण पावले असून बळींचा आकडा १,२२,१११ झाला आहे. 
ऑक्टोबरमध्ये कोरोनाचे १८,७१,४९८ नवे रुग्ण सापडले. सप्टेंबर महिन्यात हीच संख्या २६,२१,४१८ होती. सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये नव्या रुग्णांच्या संख्येत २२.८७ टक्के घट झाली. ऑक्टोबरमध्ये कोरोनाने २३,४३३ जणांचे बळी घेतले. 

कोरोना चाचण्यांचा आकडा १० कोटी ९८ लाखांवर
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबरला १०,९१,२३९ कोरोना चाचण्या पार पडल्या. देशात आजवर १०,९८,८७,३०३ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

Web Title: CoronaVirus News: New patients in October, the number of victims decreased by about 30%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.