शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
2
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
3
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
4
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
5
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
8
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
9
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
10
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
11
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
12
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
13
एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या
14
बाथरुममधील बादली खूपच खराब झालीय? एकही रुपया खर्च न करता 'अशी' दिसेल नव्यासारखी
15
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
16
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
17
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
18
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
19
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
20
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत

CoronaVirus News : एनसीईआरटी शालेय शिक्षणात बदलाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 06:53 IST

एनसीईआरटी नव्या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकांत बदल करील. याचा अंतरिम अहवाल डिसेंबर २०२० पर्यंत मंत्रालयाला सोपवला जाईल.

एस.के. गुप्ता नवी दिल्ली : कोरोनाच्या दिवसांत शालेय शिक्षण व्हर्च्युअल मार्गाने चालत आहे आणि शाळा कधी सुरू होतील याबद्दल संभ्रम असताना केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाने राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेला (एनसीईआरटी) आदेश दिला की, तिने शैक्षणिक सत्र २०२०-२०२१ साठी लर्निंग आऊटकमचे नवे मॉडेल तयार करावे. याशिवाय शिक्षणाचा नवा रोडमॅप तयार करण्यासाठी शालेय शिक्षणासाठी नव्या राष्ट्रीय अभ्यासक्रमावर (एनसीएफ) काम सुरू केले जावे. एनसीईआरटी नव्या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकांत बदल करील. याचा अंतरिम अहवाल डिसेंबर २०२० पर्यंत मंत्रालयाला सोपवला जाईल.केंद्रीय मानव संसाधन विकासमंत्री रमेश पोेखरियाल निशंक यांनी एनसीईआरटीला आदेश दिले की, अभ्यासक्रमात कपात करताना हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, महत्त्वाचा अभ्यास वगळला जाऊ नये आणि पुस्तकांत ज्ञानवर्धक साहित्य कमी असू नये. याशिवाय अभ्यासक्रमाच्या पुस्तकांत रचनात्मक विचार, जीवनकौशल्य, भारतीय लोकाचार आणि सभ्यता, कला इत्यादींचा त्यात समावेश असावा. निशंक म्हणाले, आम्हाला पूर्ण खात्री आहे की, कोरोना संकटाला ज्या प्रकारे आम्ही एका संधीत रूपांतरित केले त्याच प्रकारे पुढेही आम्ही सगळे मिळून भारतीय शिक्षण प्रणालीला नवे रूप देऊ. केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले की, नव्या अभ्यासक्रमाची रूपरेषा मार्च २०२१ पर्यंत तयार होईल आणि एनसीईआरटीने पाठ्यपुस्तकांच्या लेआऊटचे आणि डिझाईनचे काम सुरू केले आहे. सगळी नवी पाठ्यपुस्तके नव्या राष्ट्रीय अभ्यासक्रमानुसार असतील. नवा पाठ्यक्रमाचा रोडमॅप आत्मनिर्भर भारतांतर्गत मूलभूत साक्षरता, संख्यात्मकता मिशन आणि परिणाम आधारित समग्र शिक्षणावर आधारित आहे.>एनसीईआरटीला लर्निंग आऊटकमसाठी सूचनावर्ग १ ते ५ वीपर्यंत आॅक्टोबर २०२० पर्यंत आणि वर्ग ६ ते १२ वीपर्यंत लर्निंग आऊटकम समजावून सांगताना इन्फोग्राफिक्स/पोस्टर्स/सादरीकरण तयार करायचे आहेत.वर्ग १ ते ५ वीच्या शिक्षकांसाठी आॅनलाईन टीचर ट्रेनिंग कोर्स टप्प्याटप्प्याने डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण केला जावा आणि वर्ग ६ ते १२ वीच्या शिक्षकांसाठी ट्रेनिंग कोर्स टप्प्याटप्प्याने जून २०२१ पर्यंत पूर्ण केला जावा.वर्ग १ ते ५ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी टप्प्याटप्प्याने डिसेंबर २०२० पर्यंत पर्यायी शैक्षणिक साहित्य ज्या मुलांकडे आॅनलाईन शिक्षणाची कोणतीही सोय नाही त्यांच्यासाठी तयार केले जावे. याच प्रकारे वर्ग सहावी ते बारावीसाठी हे साहित्य टप्प्याटप्प्याने जून २०२१ पर्यंत तयार करायचे आहे. प्रत्येक वर्गासाठी प्रत्येक विषयाच्या लर्निंग आऊटकमच्या मूल्यांकनासाठी कौशल्याने दोन स्तरांवर कमीतकमी दहा प्रश्न वर्ग एक ते पाचवीपर्यंत नोव्हेंबर २०२० पर्यंत आणि राहिलेल्या वर्गांसाठी मार्च २०२१ पर्यंत बनवायचे आहेत.एनसीईआरटी आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत पीएम ई-विद्यासाठी वर्ग एक ते बारावीसाठी स्वयंप्रभा वाहिन्यांसाठी (एक वर्ग, एक वाहिनी-चॅनल) साहित्य तयार करील आणि आॅगस्ट २०२० पर्यंत सगळ्या वाहिन्या सुरू करतील.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या