शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: उपचारासाठी घरे गहाण, दागिने विकले, कर्जे काढली; कोरोनाबाधितांच्या कुटुंबीयांची आपबिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 05:55 IST

अनेक परिवार आपली घरे व इतर आपल्या मालमत्ता गहाण टाकून, दागदागिने मोडून अथवा कर्जे घेऊन रुग्णालयांची बिले भरीत आहेत. त्यामुळे असंख्य कुटुंबे कफल्लक झाली आहेत.

नवी दिल्ली : ‘कोविड-१९’च्या उपचारासाठी रुग्णालयांकडून आकारण्यात येत असलेली बिले भरताना नागरिकांच्या नाकी नऊ येत असल्याच्या बातम्या देशभरातून येत आहेत. अनेक परिवार आपली घरे व इतर आपल्या मालमत्ता गहाण टाकून, दागदागिने मोडून अथवा कर्जे घेऊन रुग्णालयांची बिले भरीत आहेत. त्यामुळे असंख्य कुटुंबे कफल्लक झाली आहेत.गुवाहाटीच्या एका ५० वर्षीय छोट्या व्यावसायिकाने सांगितले की, गेल्या महिन्यात मी बाधित झालो. माझा संसर्ग सामान्य होता, पण माझा भाऊसुद्धा बाधित झाला. त्याची प्रकृती खालावली होती. आम्ही अनेक रुग्णालये पाहिली, मात्र त्यांची फी आमच्या आवाक्याबाहेर होती. नंतर एका रुग्णालयाने एकरकमी १.७ लाखांत उपचार देण्याचे मान्य केले. बजेटपेक्षा थोडेसे जास्त असूनही आम्ही भावाला तेथे भरती केले. उपचार पूर्ण झाल्यानंतर रुग्णालयाने जे बिल दिले, ते ठरलेल्या रकमेपेक्षा दुप्पट होते. औषधी आणि इतर अनेक बाबींचे अतिरिक्त शुल्क त्यांनी आकारले होते. आम्ही दिवसभर वाद घातला, पण पूर्ण बिल भरल्याशिवाय रुग्णालयाने आम्हाला सुटी दिली नाही. आता आम्ही पूर्ण बरे झाले असलो तरी बिल भरण्यासाठी केलेल्या उसनवाऱ्यांनी जिवाला चिंता लावली आहे. तेलंगणातील एका १८ वर्षीय तरुणाने सांगितले की, दोन आठवड्यांपूर्वी माझे वडील बाधित झाले. आम्ही अनेक खासगी रुग्णालये धुंडाळली, पण दाखल करण्यापूर्वीच रुग्णालये २ लाख रुपये मागत होते. शिवाय, ७५ हजार रुपये उपचारांचा खर्च होता. तेवढे पैसे नसल्यामुळे आम्ही वडिलांना सरकारी रुग्णालयात दाखल केले. दोन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. मणिपूर येथील राष्ट्रीय पुरस्कार विजेते सिनेमाटोग्राफर इरोम मैपाक यांच्या उपचाराचे ९ लाखांचे बिल झाले.  त्यांची पत्नी रिटा थौनाओजाम यांनी आपला एक लाखाचा नेकलेस मोडला आणि उरलेले पैसे मित्र व नातेवाइकांकडून उसने घेतले.अनेक राज्यांनी रुग्णालयांच्या बिलांना मर्यादा घालणारे नियम केले असले तरी त्यांची अंमलबजावणी होताना दिसत नाही, असे सूत्रांनी सांगितले.हैदराबादेतील एका इलेक्ट्रिशियनवरील उपचाराचे २३ लाख रुपयांचे बिल रुग्णालयाने काढले. विशेष म्हणजे त्यांनी एक लाख ॲडव्हान्स दिलेले होते आणि ३.५ लाख रुपये उपचारादरम्यान भरले होते. घर गहाण टाकण्याशिवाय  पर्यायच राहिलेला नाही, असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या