शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

CoronaVirus News: दिलासादायक! देशात नव्या रुग्णांचा ४६ दिवसांतील नीचांक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 07:14 IST

कोरोनाने बळी पडणाऱ्यांच्या संख्येतही घट

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. रविवारी कोरोनाचे १ लाख ६५ हजार ५५३ नवे रुग्ण आढळून आले. गेल्या ४६ दिवसांतील हा नीचांक आहे. याला बळी पडणारे तसेच सक्रिय रुग्णांची संख्याही कमी झाली असून, रविवारी ३४६० जण मरण पावले. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णांची एकूण संख्या २ कोटी ७८ लाख ९४ हजार ८०० असून, त्यातील २ कोटी ५४ लाख ५४ हजार ३२० जण बरे झाले. आतापर्यंत ३ लाख २५ हजार ९७२ लोकांचा मृत्यू झाला आहे. रविवारी कोरोनातून २ लाख ७६ हजार रुग्ण बरे झाले. देशात सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली असून, रविवारी ती २१ लाख १४ हजार ५०८ होती. शनिवारी हीच संख्या २२ लाख २८ हजार ७२४ होती. कोरोनाचा फैलाव कमी करण्यासाठी या राज्यांसह इतर राज्यांनीही सध्या कडक लॉकडाऊन लागू केला आहे.  कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने काही राज्यांत लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल केले आहेत.६५% रुग्ण पाच राज्यांमध्ये तमिळनाडू, केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या पाच राज्यांत देशातील ६५.३  टक्के काेराेना रुग्ण आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या