शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

CoronaVirus News : कोरोनाचा विस्फोट! गेल्या २४ तासांत ३४९८ जणांचा मृत्यू, तर ३८६४५२ नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 10:25 IST

CoronaVirus News : कोरोना संसर्गाने आतापर्यंत २ लाख ०८ हजार ३३० जणांचा बळी घेतला आहे.

ठळक मुद्देदेशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

नवी दिल्ली : देशात गेल्या चोवीस तासांत ३ लाख ८६ हजार ४५२ नवे रुग्ण आढळले. तर दिसभरात कोरोनामुळे ३४९८ जणांचा मृत्यू झाला. तसेच २ लाख ९७ हजार ५४० रुग्ण बरे झाले आहेत. जगातील इतर देशांपेक्षा भारतात दिवसेंदिवस सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद होत आहे. (India reports 3,86,452 new #COVID19 cases, 3498 deaths and 2,97,540 discharges in the last 24 hours, as per Union Health Ministry)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ कोटी ८७ लाख ६२ हजार ९७६ झाली असून, त्यातील १ कोटी ५३ लाख ८४ हजार ४१८ जण बरे झाले. या कोरोना संसर्गाने आतापर्यंत २ लाख ०८ हजार ३३० जणांचा बळी घेतला आहे. देशात कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या ३१ लाख ७० हजार २२८ इतकी आहे. 

देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट देशाला नव्या संकटाच्या गर्तेत ढकलताना दिसत आहे. बेड, ऑक्सिजन आणि वेळेत उपचार न मिळाल्याने दररोज हजारो भारतीयांना प्राण गमावावे लागत आहे. देशात मृत्यूचे तांडवच सुरू असून, अनेक राज्यांमध्ये रुग्णालयांपासून ते स्मशानभूमीपर्यंत रांगा लागलेल्या दिसत आहेत.

दरम्यान, जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. चीनमधून वेगाने जगभरात पसरलेल्या कोरोनाचा फटका जवळपास सर्वच देशांना बसला आहे. जगातील कोरोना रुग्णांची संख्या ही आता तब्बल १४ कोटींच्या पुढे गेली असून लाखो लोकांना यामुळे जीव गमावला आहे. तर  अनेक देशांमधील परिस्थिती  कोरोनामुळे गंभीर झाली आहे. 

कोरोनाची दुसरी लाट मे अखेरीस ओसरणार!कोरोनाची दुसरी लाट मेच्या तिसऱ्या आठवड्यापासून ओसरण्यास सुरुवात होणार असल्याचा दिलासादायक अंदाज आयआयटी कानपूर आणि हैदराबादच्या वैज्ञानिकांनी ‘सूत्र’ नावाच्या एका प्रारूपाचा वापर करून वर्तविला आहे. याची सुरुवात महाराष्ट्रापासूनच होणार असून, रुग्णसंख्या कमी होणार आहे. कोरोनाच्या  दुसऱ्या लाटेचा उच्चांक सर्वप्रथम महाराष्ट्राने अनुभवला. त्यामुळे १५ मेनंतर लाट ओसरण्याची सुरुवातही महाराष्ट्रापासूनच होईल, असा अंदाज या गणीतीय प्रारूपाच्या माध्यमातून बांधण्यात आला आहे. यानुसार  भारतात १४ ते १८ मे दरम्यान  कोरोना रुग्णांची संख्या सर्वोच्च  बिंदू गाठेल आणि तिसऱ्या आठवड्यापासून रुग्णसंख्या कमी होऊ लागेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत