शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

CoronaVirus News : चाचण्या घेण्यात भारताचा विक्रम नऊ दिवसांत एक कोटी, एकूण सहा कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 06:26 IST

अवघ्या सात महिन्यांत भारताने चाचण्यांच्या पायाभूत सुविधा उभारल्या आहेत.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : फक्त नऊ दिवसांत भारताने एक कोटी कोरोना चाचण्या करून विक्रम नोंदवला आहे. यामुळे एकूण चाचण्यांची संख्या सहा कोटींवर गेली. पहिल्या एक कोटी चाचण्या १५८ दिवसांत पूर्ण झाल्या. अवघ्या सात महिन्यांत भारताने चाचण्यांच्या पायाभूत सुविधा उभारल्या आहेत. चाचण्यांसाठीच्या प्रयोगशाळा १०० वरून १५ सप्टेंबरपर्यंत १७३६ झाल्या.११ दिवसांत १० लाख नवे रुग्णभारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या अवघ्या ११ दिवसांत ४० लाखांवरून ५० लाखांवर गेली आहे. याचा अर्थ ११ दिवसांत १० लाख नवे रुग्ण आढळून आले. या साथीच्या प्रारंभीच्या काळात रुग्णसंख्येचा एक लाखाचा टप्पा गाठायला ११० दिवस लागले होते, तर त्यापुढील ५९ दिवसांत ही रुग्णसंख्या १० लाख झाली होती. त्यापुढच्या २१ दिवसांत रुग्णसंख्या १० लाखांवरून २० लाखांवर गेली. १६ दिवसांत या रुग्णांची संख्या २० लाखांवरून ३० लाखांवर पोहोचली. या कालावधीत रुग्णसंख्या वाढीचा वेग आणखी वाढला. अवघ्या १३ दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या ३० लाखांवरून ४० लाख झाली होती.देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 50,00,000-  90123 नवे रुग्ण बुधवारी देशामध्ये आढळून आले असून, एकूण रुग्णांची संख्या आता ५० लाखांवर पोहोचली आहे. कोरोनामुळे आणखी १२९० जण मृत्यू पावले असून, एकाच दिवसातील मृतांची ही सर्वाधिक संख्या आहे. आता कोरोना बळींची एकूण संख्या ८२,०६६ झालीआहे.केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या ५०,२०,३५९ वर पोहोचली आहे. त्यातील ३९,४२,३६० जण या आजारातून बरे झाले आहेत. सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्येच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावरील अमेरिकेमध्ये ६७ लाख ८८ हजार रुग्ण आहेत, तर दुसऱ्या स्थानावरील भारतातली रुग्णसंख्या अमेरिकेपेक्षा १७ लाखांनी कमी आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.६३ टक्के इतका कमी राखण्यात भारताला यश आले आहे.सध्या देशात ९,९५,९३३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून ही संख्या एकूण रुग्णांच्या तुलनेत १९.८४ टक्के आहे. आयसीएमआरनुसार मंगळवारी कोरोनाच्या ११,१६,८४२ चाचण्या करण्यात आल्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत