शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

CoronaVirus News: शुभसंकेत! कोरोना संकटात देशाला डबल दिलासा; ४० दिवसांनंतर प्रथमच 'असं' घडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 08:46 IST

CoronaVirus News: देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट; आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी झाल्यानं दिलासा

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला दर दिवशी देशात ४ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत होते. आता मे महिना संपता संपता हाच आकडा २ लाखांच्या खाली आला आहे. १४ एप्रिलनंतर पहिल्यांदाच देशात दिवसाला २ लाखांहून कमी रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना मृतांचा आकडा मात्र वाढला होता. त्यातदेखील आता घट झाली आहे.दिलासादायक! राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण घटले, पॉझिटिव्हिटी दर २० टक्क्यांपेक्षाही खाली१४ एप्रिलनंतर प्रथमच देशात २ लाखांहून कमी कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. गेले ४० दिवस देशात दररोज २ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत होते. त्यात आता लक्षणीय घट होताना दिसत आहे. https://www.covid19india.org/ च्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १ लाख ९५ हजार ६८५ नवे रुग्ण आढळून आले. तर ३ लाख २६ हजार ६७१ नव्या रुग्णांची नोंद झाली. सामान्यांना लोकल तूर्त बंदच, आता जिल्हानिहाय निर्बंधांचा सरकारचा विचारदेशात काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढला होता. अनेक दिवस ४ हजारहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आता हा आकडा साडे तीन हजारांच्या खाली आला आहे. गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ३ हजार ४९६ जण दगावले आहेत. ३ मेनंतर प्रथमच देशात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या साडे तीन हजारांच्या खाली आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्यांचं प्रमाण नव्या रुग्णांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी झाला आहे.सक्रिय रुग्णांची संख्या २६ लाखांच्या खालीदररोज आढळून येत असलेल्या रुग्णांच्या संख्येत घट होत असल्यानं सक्रिय रुग्णांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. गेल्या २२ दिवसांपासून सक्रिय रुग्णांच्या संख्येत सातत्यानं घट होत असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली. ३ मे रोजी देशातील ऍक्टिव्ह रुग्णांचं प्रमाण १७.१० टक्के होतं. आता ते १० टक्क्यांच्या खाली आलं आहे. गेल्या २ आठवड्यांत ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या जवळपास १० लाखांनी कमी झाली आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या २६ लाखांच्या खाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या