शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : भारतात कोरोनाची दुसरी मोठी लाट येण्याची शक्यता नाही, वैद्यकीय तज्ज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2020 05:21 IST

CoronaVirus News in India : देशातील रुग्णांची संख्या १ कोटीच्या वर पोहोचली असली तरी दररोज आढळणारे नवे रुग्ण व बळींची संख्या कमी होत आहे.

नवी दिल्ली : भारतामध्ये कोरोनाची दुसरी मोठी लाट येण्याची शक्यता नाही आणि समजा तशी लाट आलीच तर ती खूप गंभीर स्वरूपाची असणार नाही, अशी शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. आगामी काही वर्षांत कोरोना संसर्गाच्या छोट्या स्वरूपाच्या लाटा येत राहातील, असेही या तज्ज्ञांनी म्हटले आहे.देशातील रुग्णांची संख्या १ कोटीच्या वर पोहोचली असली तरी दररोज आढळणारे नवे रुग्ण व बळींची संख्या कमी होत आहे. प्रसिद्ध विषाणूजन्य रोगांचे तज्ज्ञ डॉ. शाहिद जमील यांनी सांगितले की, देशात नोंदविल्या गेलेल्या रुग्णांपेक्षा प्रत्यक्षात १६ पट अधिक आहेत, असे दुसऱ्या सिरो सर्वेक्षणाच्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे देशात खरे तर १६ कोटी रुग्ण आहेत, असे म्हणता येऊ शकते. इतक्या रुग्ण असल्याने व त्यांची प्रतिकारक्षमताही वाढल्याने संसर्गाची साखळी अनेक ठिकाणी तुटली आहे. त्यामुळे दुसरी लाट आलीच तरी फार गंभीर असणार नाही.

सलग सातव्या दिवशी नवे  रुग्ण ३० हजारांहून कमी- देशामध्ये सलग सातव्या दिवशी कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या ३० हजारांपेक्षा कमी आहे. - दररोजच्या नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. - कोरोनाच्या रुग्णांची संख्या १ कोटी ३१ हजार झाली असून त्यातील ९५ लाख ८० हजार लोक बरे झाले, ही दिलासा देणारी बाब आहे. 

अमेरिकेत एकाच दिवसात ४ लाख नवे रुग्णअमेरिकेमध्ये शुक्रवारी एकाच दिवसात ४ लाखांहून अधिक नवे रुग्ण सापडले आहेत. त्या देशातील रुग्णांची एकूण संख्या १ कोटी ८० लाख झाली असून १ कोटी ५ लाख जण बरे झाले. वाढच्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाच्या चिंतेत मोठी भर पडल्याचे दिसून येत आहे. 

लंडनमध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन लागूब्रिटनची राजधानी लंडनमध्ये कोरोनाचा फैलाव वाढत असून त्यामुळे नाताळच्या वेळेस बंधने शिथिल करण्याचा निर्णय पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रद्द केला आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात होते तसेच कडक स्वरूपाचे लॉकडाऊन आता लागू राहील.

लस उत्पादकांना संरक्षण देण्याची अदर पूनावाला यांची मागणीकोरोना लसीचे दुष्परिणाम झाल्याचा खोटा दावा करणारे लोक व त्यांनी दाखल केलेल्या खटल्यांपासून लस उत्पादकांचे केंद्राने संरक्षण केले पाहिजे, अशी मागणी ‘सीरम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत