शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: "आकड्यांमध्ये जाऊ नका, आकांडतांडव करून मेलेली माणसं जिवंत होणार नाहीत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 15:18 IST

CoronaVirus News: हरयाणाचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते मनोहर लाल खट्टर यांचं विधान

चंदिगढ: गेल्या सहा दिवसांपासून देशात दररोज ३ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. अनेक राज्यांमधील परिस्थिती भीषण होत चालली आहे. सर्वोच्च न्यायालयापासून ते जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांपर्यंत अनेकांनी भारतातील स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. देशातील आरोग्य व्यवस्था सध्या व्हेंटिलेटरवर आहे. हरयाणादेखील याला अपवाद नाही. मात्र या परिस्थितीवर बोलताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी धक्कादायक विधान केलं आहे. कोरोना संकटात मोठी मदत; इंग्लंडमधून भारतात पोहोचली 100 व्हेंटिलेटर, 95 ऑक्सिजन काँसंट्रेटरची पहिली खेपहरयाणातील कोरोना स्थिती, मृतांचा आकडा, त्यातील लपवाछपवी याबद्दल हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावर ही वेळ आकड्यांवर लक्ष देण्याची नाही. आमच्या आकांडतांडवानं मेलेली माणसं जिवंत होणार नाहीत, असं वक्तव्य खट्टर यांनी केलं. रुग्णांपर्यंत आरोग्य सुविधा कशा पोहोचतील याकडे आपण लक्ष द्यायला हवं. आम्ही त्याच उद्देशानं सध्या प्रयत्न करत आहोत, असं खट्टर म्हणाले.भयावह! मृत्यूनंतर तब्बल 21 तास घरातच पडून होता कोरोनाग्रस्ताचा मृतदेह; मग झालं असं काही...राज्यात वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा नाही. रुग्णांना हरतऱ्हेच्या सुविधा देण्यास राज्य सरकारचं प्राधान्य दिलं जात असल्याचं खट्टर यांनी सांगितलं. राज्यातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी खट्टर यांनी रोहतक, पानीपत, फरिदाबादचा दौरा केला. रेवाडी, गुरुग्राम आणि हिसारमध्ये गेल्या काही दिवसांत ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. त्यावर राज्यात कुठेही वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा नाही. या प्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती खट्टर यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या