शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

CoronaVirus News: 'मुन्नाभाई'लाही लाजवेल अशी वेळ; कोरोना रुग्ण बेड घेऊन हॉस्पिटलबाहेर आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 07:50 IST

CoronaVirus News: रुग्णालयात बेड मिळेना; रुग्णालयाबाहेर १०० पेक्षा अधिक रुग्णवाहिका रांगेत उभ्या

राजकोट: देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढत आहे. देशात दोन आठवड्यांपूर्वी सर्वप्रथम दिवसभरात १ लाखाहून अधिक रुग्ण आढळून आले. त्यानंतर १० दिवसांतच हा आकडा २ लाखांच्या पुढे गेला. आता गेला आठवडाभर देशात दररोज कोरोनाच्या २ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. अनेक राज्यांमधील आरोग्य यंत्रणा कोसळण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना उपचार मिळणं अवघड झालं आहे. महाराष्ट्राच्या शेजारील गुजरातमध्ये कोरोनामुळे स्थिती अतिशय गंभीर होत चालली आहे.राज्यात आज रात्रीपासून कडक लॉकडाऊन? जिल्हाबंदी; उद्धव ठाकरे घोषणा करणारगुजरातमध्ये काल कोरोनानं सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांना बेड मिळत नाहीए. त्यामुळे रुग्णांना घरातूनच बेड आणावा लागत आहे. राजकोटमध्ये काल सकाळी सिव्हिल रुग्णालयाच्या जवळ असलेल्या चौधरी मैदानात १०० हून अधिक रुग्णवाहिका आणि खासगी वाहनं रांगेत उभी होती. रुग्णालयात बेडच शिल्लक नसल्यानं रुग्णांना रुग्णवाहिका आणि खासगी वाहनांमध्ये वाट पाहावी लागत आहे.देशव्यापी लॉकडाऊन नाही; केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांची उद्योग क्षेत्रास ग्वाहीराजकोटमध्ये कोरोनाचा कहर वाढला. त्यामुळे दिवसागणिक परिस्थिती बिघडत आहे. चौधरी शाळेच्या मैदानात अनेक रुग्ण बेड कधी मिळेल याच्या प्रतीक्षेत आहेत. काही नातेवाईकांनी त्यांना शक्य होईल तशी व्यवस्था करून रग्णावर उपचार करत आहेत. बराच वेळ वाट पाहूनही एका रुग्णाला बेड न मिळाल्यानं त्याच्या कुटुंबीयांनी घरातून त्याच्यासाठी बेड आणला आणि ऑक्सिजन सिलिंडरच्या मदतीनं त्याच्यावर उपचार करू लागले.  'मुन्नाभाई एमबीबीएस' चित्रपटामध्ये अभिनेता संजय दत्त हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी सगळं सामान घरून घेऊन येतो. तशीच काहीशी स्थिती गुजरातमध्ये दिसू लागली आहे.राजकोटमधील आरोग्य यंत्रणाच सध्या व्हेंटिलेटवर आहे. कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सिव्हिल रुग्णालयाबाहेर १०० हून अधिक रुग्णवाहिका उभ्या आहेत. कित्येक रुग्ण रात्रभर रुग्णवाहिकेतच आहेत. मात्र बेड शिल्लक नसल्यानं त्यांना रुग्णालयात घेतलं जात नाही. शहरात १०८ क्रमांकावर रुग्णवाहिका सेवा उपलब्ध आहे. पण कित्येक रुग्णवाहिका रुग्णांना घेऊन रुग्णालयाबाहेर असलेल्या रांगेत उभ्या असल्यानं अनेक रुग्णांना खासगी वाहनांतून रुग्णालय गाठावं लागत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या