शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : कोरोना चाचणीेचा देशव्यापी विस्तार करा- ICMR

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 03:38 IST

देशाच्या प्रत्येक भागामध्ये ही चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध झाली पाहिजे. असे झाल्यास या साथीविरोधात अधिक प्रभावीपणे लढा देता येईल.

नवी दिल्ली : कोरोना संसर्गासारखी लक्षणे दिसणाऱ्या सर्वांचीच या आजाराबाबतची वैद्यकीय चाचणी होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने या सुविधेचा विस्तार झाला पाहिजे, असे इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) म्हटले आहे. कोरोना रुग्णांवरील उपचारांसंदर्भात नवी धोरणे राबविण्याविषयी आयसीएमआरने आपले विचार मांडले आहेत. त्यात म्हटले आहे की, कोरोना संशयितांची चाचणी करावी. त्यानंतर निदान झाल्यानंतर, रुग्णांवर उपचार करावेत. याच मार्गाने कोरोना संसर्गाशी मुकाबला करून अनेकांचे प्राण वाचविता येतील. अधिकाधिक लोकांची कोरोना चाचणी करता यावी म्हणून या सुविधेचा विस्तार केला पाहिजे. देशाच्या प्रत्येक भागामध्ये ही चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध झाली पाहिजे. असे झाल्यास या साथीविरोधात अधिक प्रभावीपणे लढा देता येईल.कोरोनाशी कसे लढावे, याबद्दल आयसीएमआरने १८ मे रोजी एक धोरण जाहीर केले होते. त्यात आणखी बदल करून नवे धोरण या संस्थेने जाहीर केले आहे. इन्फ्लुएंझा तापासारखी लक्षणे दिसू लागताच सात दिवसांच्या आत त्या रुग्णाची कोरोना चाचणी झाली पाहिजे. कोरोना साथीचा मोठ्या प्रमाणात फैलाव झालेल्या भागांत राहाणारे तसेच इन्फ्लुएंझा तापासारखी लक्षणे जाणवणारे रुग्ण, कोरोना रुग्णांची सेवा करणारे आरोग्यसेवक या सर्वांची कोरोना चाचणी झाली पाहिजे. रुग्णालयात दाखल झालेल्या व इन्फ्लुएंझा तापासारखी लक्षणे जाणवणाऱ्यांचीही कोरोना चाचणी करावी, असेही या संस्थेने त्यावेळी या धोरणात म्हटले होते. आता मात्र देशभरात कोरोना चाचणीच्या सुविधेचा विस्तार करावा असे आयसीएमआरचे मत आहे.>जनतेच्या मनातील भीती दूर व्हावीआयसीएमआरने म्हटले आहे की, सर्व सरकारी व खासगी रुग्णालयांनी, तसेच सार्वजनिक उपक्रमांनी अँटिबॉडीवर आधारित कोरोना चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यायला हवी. त्यामुळे साथीच्या प्रसाराला प्रभावी आळा घालता येईल व या आजाराबद्दल जनतेच्या मनात असलेली भीतीही दूर होईल. स्थलांतरित मजूर मोठ्या प्रमाणावर असलेले भाग, साथीचा फैलाव झालेले भाग इथे कोरोना चाचणीची सुविधा वाढवावी, असे आयसीएमआरने मे महिन्यात जारी केलेल्या धोरणात म्हटले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या