शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : कोविड-१९मुळे बदलली डीयूची प्रवेश प्रक्रिया, जेएनयूत अर्जाची तारीख ३० पर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 03:28 IST

CoronaVirus News : प्रवेशासाठी पहिला कटऑफ सीबीएसई बोर्ड परीक्षेचे निकाल जाहीर झाल्यावर येईल.

एस. के. गुप्ता नवी दिल्ली : कोरोनाच्या उद्रेकामुळे शाळा, महाविद्यालयांतील शिक्षणाचे स्वरूपच बदलले नाही तर प्रवेश प्रक्रियेतदेखील मोठ्या स्तरावर बदल झाल्याचे बघायला मिळत आहे. दिल्ली विद्यापीठाने (डीयू) जवळपास दीड महिना विलंबाने प्रवेशासाठी अर्जांची प्रक्रिया सुरू केली आहे. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश चार जुलैपर्यंत खुले आहेत. प्रवेशासाठी पहिला कटऑफ सीबीएसई बोर्ड परीक्षेचे निकाल जाहीर झाल्यावर येईल.प्रवेश प्रक्रियेचे वैशिष्ट्य हे की, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षेच्या गुणवत्तेवर (मेरीट) स्पोटर््स कोटा आणि अभ्यासेतर उपक्रमांच्या (गीत, संगीत, नृत्य) आधारावर होणारे प्रवेश मुलाखतीशिवाय होतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या अ‍ॅक्टिव्हिटीज आणि परफार्मन्सच्या व्हिडिओ क्लिप अ‍ॅटॅच करून पाठवाव्या लागतील.जवाहरलाल नेहरू विद्यापीठात प्रवेश प्रक्रियेसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची तारीख वाढवून ३० जून केली आहे. आधी ही अंतिम तारीख १५ जून होती. गुरू गोविंद सिंग इंद्रप्रस्थ विद्यापीठातही वेगवेगळ््या अभ्यासक्रमांत प्रवेशासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवून ३० जून केली आहे. जामिया विद्यापीठात प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता बोर्ड परीक्षांचे निकाल आल्यानंतर प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू होईल.डीयूमध्ये प्रवेश प्रक्रियेआधी दर वर्षी ओपन डेजचे आयोजन केले जात होते. कोविड-१९ मुळे यंदा ओपन डेज वेबिनार आणि आॅनलाइन केले जात आहेत. त्यातून संबंधितांना प्रवेशासंबंधी माहिती घेता येईल. प्रवेशासाठी महाविद्यालयांकडून लावला जाणारा एलिजिबिलिटी क्रायटेरियाला डीयूने हटवला आहे. खेळाच्या कोट्याच्या विद्यार्थ्यांसाठी विना ट्रायल व प्रमाणपत्राच्या आधारावर प्रवेश देणे निश्चित केले आहे. ईसीए कोट्यातील विद्यार्थ्यांना त्यांच्या परफॉर्मन्सची व्हिडिओ क्लिप यूट्यूबवर अपलोड करावी लागेल. त्या आधारावर प्रवेश दिला जाईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या