शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: मार्चमध्ये लसीचा दुसरा डोस घेतलेल्या डॉक्टरचं कोरोनामुळे निधन; रुग्णालयावर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 17:54 IST

CoronaVirus News: मार्चच्या पहिल्याच आठवड्यात घेतला होता कोरोना लसीचा दुसरा डोस; १० ते १२ दिवसांपूर्वी झालं कोरोनाचं निदान

दिल्ली: कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही एका डॉक्टरचं कोरोनामुळे निधन झाल्याची घटना  दिल्लीत घडली आहे. दिल्लीच्या सरोज रुग्णालयात ही घटना घडली आहे. डॉ. अनिल कुमार रावत असं मृत पावलेल्या डॉक्टरांचं नाव आहे. प्रकृती खालावल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र शनिवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं वय ५८ वर्षे होतं. मार्चमध्येच त्यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला होता.भारतात पुढील ३ महिन्यांत कोरोनाचा हाहाकार, १० लाख लोकांचा होणार मृत्यू; लॅन्सेटचा गंभीर इशारामी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यामुळ मी लवकरच कोरोनावर मात करेन, असा विश्वास रावत यांना होता. त्यांनी ही गोष्ट त्यांच्या सहकाऱ्यांकडे बोलूनही दाखवली होती. रावत १९९६ पासून सरोज रुग्णालयात कार्यरत होते. अतिशय सभ्य माणूस, उत्तम सहकारी अशी त्यांची ओळख होती. मार्च महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी कोविशील्ड लसीचा दुसरा डोस घेतला होता.कोरोना लस पुरवठ्याबद्दल कोणीही भारताला लेक्चर देऊ नये; फ्रान्सचे पंतप्रधान कडाडलेडॉ. अनिल कुमार रावत मला माझ्या मोठ्या मुलाप्रमाणे होते, अशा शब्दांत रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉ. पी. के. भारद्वाज यांनी त्यांच्या भावना बोलून दाखवल्या. 'मौलाना आझाद वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी एमएस सर्जरी केली. आरबी जैन रुग्णालयातील युनिटमधून त्यांनी १९९४ मध्ये स्वत:च्या कारकिर्दीला सुरुवात केली. शेवटच्या श्वासापर्यंत ते माझ्यासोबत होते,' असं भारद्वाज यांनी सांगितलं.१० ते १२ दिवसांपूर्वी अनिल कुमार रावत यांना कोरोनाची लागण झाली. सुरुवातीला ते घरीच आयसोलेशनमध्ये होते. मात्र त्यानंतर त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी खालावली. त्यामुळे त्यांना सरोज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉ. भारद्वाज आणि त्यांच्या पूर्ण टीमनं रावत यांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. 'त्यांना वाचवण्यासाठी आम्ही हरतऱ्हेचे प्रयत्न केले. मात्र आम्हाला यश आलं नाही. आमच्यासाठी ही खूप मोठी हानी आहे,' असं भारद्वाज म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या