शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: दिल्लीत कोरोनानं हाहाकार; स्मशानात मृतदेहांसाठी जागाच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 13:24 IST

CoronaVirus News: वर्षानुवर्षे निगमबोध घाट येथे अंत्यसंस्कार करणाऱ्या पंडितांच्या मते, कोरोना कालावधीत त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

नवी दिल्लीः राजधानीत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. संसर्ग झालेल्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. दिल्लीत कोरोनाचा मोठा फैलाव झाल्यानं स्मशानात मृतांचा खच पडलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे मृतदेहांवर अंतिम संस्कार करणारे पंडित अन् स्मशानातील कर्मचारीही वैतागलेले आहेत. वर्षानुवर्षे निगमबोध घाट येथे अंत्यसंस्कार करणाऱ्या पंडितांच्या मते, कोरोना कालावधीत त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.गेल्या 15 दिवसांपासून स्मशानातील आचार्य आणि त्यांच्या निगमबोध यांच्या पथकाद्वारे दररोज 40 ते 50 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. आता ते लोकही कंटाळलेले आहेत. मृतदेहांचा आकडा सतत वाढत असल्यानं ते देखील अस्वस्थ झाले आहेत. ते म्हणतात की, जेव्हा कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे मृतदेह येऊ लागले, तेव्हा सरकारने आणखी 4 स्मशानभूमी तयार करण्यास सुरुवात केली. निगमबोध घाटातील सध्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी 48 प्लॅटफॉर्म आहेत, पण तेसुद्धा कमी पडत आहेत. त्यामुळे नदीकाठी आणखीन 25 जागांवर नवे प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत आहेत. स्मशानभूमीत जागेची कमतरतादेशाची राजधानी दिल्लीत एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या 34,000च्या वर गेली आहे, तर दुसरीकडे मृत्यूची संख्याही दररोज वाढत आहे. स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा कमी पडत आहे, अशी परिस्थिती आहे. त्यामुळेच पहिल्यांदा दोन स्मशानभूमी असलेल्या दिल्लीत आता 4 स्मशानभूमी करण्यात आल्या आहेत. सर्व कोरोना रुग्णांच्या मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी ५ ते ६ तास लागतात. निगमबोध घाटावर कमी जागानिगमबोध घाटात लोकांच्या अंत्यसंस्कारांसाठी जवळपास 100 प्लॅटफॉर्म आहेत, त्यापैकी 48 प्लॅटफॉर्मवर कोरोना रुग्णांवर अंतिम संस्कार करण्यात येत आहेत. हे सर्व प्लॅटफॉर्म पूर्णपणे भरले आहेत. एकामागून एक शव रुग्णवाहिकांमध्ये आणले जात आहेत आणि त्यांचे अंतिम संस्कार केले जात आहेत.रुग्णालयांवर दुर्लक्ष केल्याचा आरोपमोनिकाने आपल्या वडिलांना भरलेल्या डोळ्यांनी निरोप दिला आणि तिच्या वडिलांना दिल्लीच्या एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाच्या दुर्लक्षामुळे तिच्या वडिलांचा मृत्यू झाल्याचा आरोप मोनिकाने केला आहे. सकाळी ती वडिलांचा मृतदेह घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचली तेव्हा रुग्णालयातून दुसर्‍या व्यक्तीचा मृतदेह तिच्या हातात देण्यात आला. मोनिकाला अजूनही अडचणींचा सामना करावा लागला आहे. जेव्हा निगमबोध घाटावर वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी पोहोचली तेव्हा तेथेही तिला 4 ते 5 तास थांबावे लागले. अशीच काहीशी परिस्थिती दिल्लीतल्या पंजाबी बाग स्मशानभूमीच्या बाबतीतही आहे. या घाटात 4 सीएनजी आणि 71 लाकूडांवर मृतदेह जाळण्याची व्यवस्था आहेत. मैदानाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी बरेच मृतदेह जाळले जात आहेत. ते खरंच भयानक आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या