शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: ५० हजारांची मदत, अडीच हजार पेन्शन; कोरोना संकटात केजरीवालांच्या मोठ्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 18:15 IST

CoronaVirus News: कोरोनाचा फटका बसलेल्या कुटुंबांसाठी दिल्ली सरकारच्या महत्त्वपूर्ण घोषणा

नवी दिल्ली: देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र आकडेवारीवरून पाहायला मिळत आहे. मात्र दररोज दोन लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत असल्यानं धोका कायम आहे. त्यामुळे दिल्ली सरकारनं अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. रेशन दुकानांतून धान्य खरेदी करत असताना त्यांच्याकडून माफक रक्कम घेतली जायची. मात्र आता तसं होणार नाही. प्रत्येक कार्डधारकाला दर महिन्याला १० किलो मोफत धान्य मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.काही व्यक्तींकडे रेशन कार्ड नाही. मात्र अशा व्यक्तींना रेशनची आवश्यकता असेल, तर त्यांना रेशन मोफत दिलं जाईल. दिल्लीतील रेशन कार्डधारकांची संख्या ७२ लाख इतकी आहे. त्यांना सध्या केंद्राकडून ५ किलो धान्य मिळत आहे. आता त्यांना दिल्ली सरकारकडून ५ किलो धान्य मिळेल. त्यामुळे नागरिकांना महिन्याला १० किलो धान्य मिळेल. कोरोना संकटामुळे अनेक कुटुंब अडचणींचा सामना करत आहेत. एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचं निधन कोरोनामुळे झालं असल्यास त्या कुटुंबाला ५० हजार रुपयांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा केजरीवालांनी केली.कोरोनामुळे घरातील व्यक्ती गमावलेल्या कुटुंबासाठी दिल्ली सरकारनं अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. 'कोरोनामुळे कमावती व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांना ५० हजार रुपयांची मदत करण्यात येईल. याशिवाय त्या कुटुंबाला दर महिन्याला अडीच हजार रुपयांची पेन्शन देण्यात येणार आहे. कोरोनामुळे आई वडील गमावणाऱ्या लहान मुलांना त्यांच्या वयाची पंचविशी येईपर्यंत दर महिन्याला अडीच हजार रुपये दिले जातील. या मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च दिल्ली सरकार करेल,' असं केजरीवाल यांनी सांगितलं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याArvind Kejriwalअरविंद केजरीवाल