शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

CoronaVirus News: भारतात मृत्यूचे प्रमाण जगापेक्षा निम्म्याने कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 00:20 IST

सर्वत्र संसर्ग वाढूनही ‘क्लोज केसेस’मध्ये सरस कामगिरी : रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील तुलनेत दिलासादायक

- अमोल मचालेपुणे : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभर बाधितांचा आकडा मंगळवारी ५६ लाखांपार पोहचला असतानाच भारतातही सुमारे दीड लाख रुग्ण आढळले आहेत. गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज ६ हजारांपेक्षा जास्त बाधित आढळत आहेत. ही बाब चिंताजनक असली तरी, ‘कोविड-१९’ या रोगाच्या तीव्रतेचा विचार करता संपूर्ण जगाच्या तुलनेत भारताची कामगिरी सरस असल्याचे ‘क्लोज केसेस’वरून (बरे होणारे आणि मृतांची एकूण संख्या) स्पष्ट होते. सोमवारपर्यंतच्या (दि.२५) आकडेवारीनुसार, ‘क्लोज केसेस’मध्ये जगात मृतांचे प्रमाण १२.९९ टक्के असून भारतात ते निम्म्यापेक्षाही कमी म्हणजे ६.४३ टक्के इतके आहे.

जगात ‘क्लोज केसेस’ची संख्या २६ लाख ८१ हजार ६७१ असून यात ३ लाख ४८ हजार ३८२ मृतांचा तर २३ लाख ३३ हजार २८९ बरे झालेल्यांचा समावेश आहे. भारतात ६४ हजार ८७८ ‘क्लोज केसेस’पैकी ४ हजार १७२ नागरिक उपचारानंतरही वाचू शकले नाहीत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही जगाच्या तुलनेत भारतात जास्त दिसते. जगात क्लोज केसेसमध्ये हे प्रमाण ८७.०१ टक्के असून भारतात ते ९३.५७ टक्के आहे.

भारतासह जगात रुग्णांची संख्या वाढत असतानाच या रोगाची तीव्रता अर्थात मृतांचे प्रमाण कमी होत असल्याचे आणि उपचारांमुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण संथपणे पण सातत्याने वाढत असल्याचे दिसते. जगात २ फेबु्रवारीला मृत्यूचे प्रमाण ४१.८० तर, १५ एप्रिलला २१.६३ टक्के होते. नंतर ते सातत्याने कमी होत आहे. भारतातही हाच ट्रेंड दिसतो.

स्वीडन, बेल्जियममध्ये मृत्यूचे प्रमाण अमेरिकेपेक्षा जास्त

च्‘कोविड-१९’मुळे मृत्यू झालेल्यांची संख्या अमेरिकेत सर्वांत जास्त असली तरी, ‘क्लोज केसेस’मधील मृतांच्या प्रमाणाचा विचार करता स्वीडन आणि बेल्जियम या युरोपीय देशांमध्ये ते अमेरिकेपेक्षा किती तरी जास्त आहे. अमेरिकेत ‘क्लोज केसेस’मध्ये मृतांचे प्रमाण १७.८९ टक्के आहे. स्वीडन, बेल्यिजममध्ये हे प्रमाण अनुक्रमे ४४.७७ आणि ३७.८४ टक्के इतके जास्त आहे. इटली (१८.८०) आणि फ्रान्स (३०.३७) या देशांमध्येही मृत्यूचे प्रमाण अमेरिकेपेक्षा अधिक दिसते.

३ हजारांपेक्षा जास्त जीव गमावलेल्या देशांमधील ‘क्लोज केसेस’ची संख्या ध्यानात घेता रशियात २.९७ असे सर्वांत कमी मृत्यूचे प्रमाण आहे. तेथे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही साहजिकच जगात सर्वाधिक (९७.०३) आहे. रशियानंतर टर्कीमध्ये (३.५१) मृत्यूचे प्रमाण कमी आढळले. या रोगाचे जन्मस्थान असलेल्या चीनमध्ये मृत्यूचे प्रमाण ५.५९ टक्के तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.४१ टक्के आहे.

डॉक्टरांचे कौशल्य अन् कष्टाचे फलित

आपली एकूण लोकसंख्या ध्यानात घेता देशात ‘कोविड-१९’चा संसर्ग होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. ‘क्लोज केसेस’मध्ये रुग्ण बरे होण्याचे तसेच मृत्यू होण्याचे प्रमाण जगाच्या तुुलनेत भारतात कमी आढळणे, हे डॉक्टर आणि इतर वैद्यकीय घटकांचे कौशल्य अन् कष्टाचे फलित आहे. मर्यादित वैद्यकीय सामग्री उपलब्ध असूनही त्यांनी केलेल्या कामगिरीची जगात दखल घेतली जात आहे.- डॉ. अविनाश भोंडवे, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन,

महाराष्ट्र शाखा जग आणि भारतातील ‘क्लोज केसेस’चा तुलनात्मक आढावा

दिनांक जगातील बरे/मृत (टक्केवारी) भारतातील बरे/मृत (टक्केवारी)२ फेब्रुवारी ५०४ / ३६२ (५८.२०/४१.८०) ०/० ...१५ फेब्रु. ९,५३८ / १,६६९ (८५.११/१४.८९) १/० ...२९ फेब्रु. ४२,३३० / २,९७७ (९३.४३/६.५७) ३/० ...१५ मार्च ७७.४५३ / ६,५३२ (९२.२२/७.७८) १३/२ (८६.६७/१३.३३)३१ मार्च १,७८,१६८ / ४४,०४३ (८०.१८/१९.८२) १५०/४७ (७६.१४/२३.८६)१५ एप्रिल ५,१०,१२२ / १,४०,७९१ (७८.३७/२१.६३) १,५०९/४२३ (७८.११/२१.८९)३० एप्रिल १०,४६,९९७/२,३३,८२४ (८१.७४/१८.२६) ९,०५९/१,१५४ (८८.७०/११.३०)१६ मे १८,१०,१६०/३,१२,९०२ (८५.२६/१४.७४) ३४,२५७/२,८७२ (९२.२७/७.७३)१७ मे १८,५६,५६६/३,१६,५२० (८५.४३/१४.५७) ३६,७९५/३,०२४ (९२.४१/७.५९)१८ मे १९,०५,२६१/३,१९,९६५ (८५.६२/१४.३८) ३९,२७७/३,१५५ (९२.५६/७.४४)१९ मे १९,५८,४१६/३,२४,५५४ (८५.७८/१४.२२) ४२,३०९/३,३०१ (९२.७६/७.२४)२० मे २०,२२,९३४/३,२९,२३९ (८६.००/१४.००) ४५,४२२/३,४३५ (९२.९७/७.०३)२१ मे २०,८१,१९६/३,३४,१७३ (८६.१६/१३.८४) ४८,५५३/३,५८३ (९३.१३/६.८७)२२ मे २१,८६,७७८/३,३९,४२५ (८६.५६/१३.४४) ५१,८३३/३,७२५ (९३.३०/६.७०)२३ मे २२,४४,८८६/३,४३,६०८ (८६.७३/१३.२७) ५४,४०९/३,८६७ (९३.३६/६.६४)२४ मे २२,९९,१३९/३.४६.३४३ (८६.९१/१३.०९) ५७,६९२/४,०२३ (९३.४८/६.५२)२५ मे २३,३३,२८९/३,४८,३८२ (८७.०१/१२.९९) ६०,७०६/४,१७२ (९३.५७/६.४३)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत