शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: धोक्याचा इशारा! कोरोनाचा कहर वाढणार; जूनच्या मध्यावर मृतांचा आकडा ४ लाखांवर जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 17:29 IST

CoronaVirus News: देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव कायम; मृतांचा आकडा वाढण्याचा धोका

नवी दिल्ली: देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. चारच दिवसांपूर्वी देशात पहिल्यांदाच कोरोना रुग्णांचा आकडा पहिल्यांदाच चार लाखांच्या पुढे गेला. त्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट झाली. मात्र ही घट फारशी लक्षणीय नाही. महाराष्ट्र, दिल्ली, पंजाबसह काही राज्यांमधील कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली असली तरीही धोका कायम आहे. त्यातच आता काही संशोधनांमधून कोरोनाचा धोका वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण दुपटीनं वाढू शकतं, असा धोक्याचा इशारा काही संशोधनांमधून पुढे आला आहे.कोरोनामुक्त रुग्णांनी प्लाझ्मा दान करा अन् ५ हजार रुपये मिळवा!, जगन सरकारचा मोठा निर्णययेणाऱ्या काही दिवसांत भारतात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा वाढू शकतो. सध्याच्या तुलनेत मृतांची संख्या दुपटीनं वाढू शकते, असा अंदाज बंगळुरूतल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या एका टीमनं वर्तवला आहे. कोरोनाचे सध्याचे आकडे विचारात घेऊन गणिती प्रारुपाच्या आधारे त्याचं विश्लेषण करून टीमनं हा अंदाज वर्तवला. कोरोनाचा प्रादुर्भाव असाच वाढत राहिल्यास ११ जूनपर्यंत भारतात कोरोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडा ४ लाख ४ हजारपर्यंत असेल, अशी शक्यता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या टीमनं व्यक्त केली.देवदूत! पंक्चर काढणाऱ्याने ६० वर्षीय नागरिकाने दिले ९० ऑक्सिजन सिलेंडर; रुग्णांना दिलासा  जुलैच्या अखेरपर्यंत भारतात कोरोनामुळे १० लाख १८ हजार ८७९ रुग्णांचा मृत्यू होईल, असा वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या हेल्थ मॅट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन इंन्स्टिट्यूटचा अंदाज आहे. भारतासारख्या देशात कोरोनासंदर्भात कोणताही अंदाज बांधणं अवघड आहे. कोरोना संकटात सोशल डिस्टन्सिंग, टेस्टिंग योग्य रितीनं झाल्यास बराच फरक पडतो. भारतात सध्याच्या घडीला अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा आहे. यामुळे अनेकांचे जीव जात आहेत, असं हेल्थ मॅट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन इंन्स्टिट्यूटनं म्हटलं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या