नवी दिल्ली : देशात गेल्या चोवीस तासांमध्ये १५ हजारांपेक्षा अधिक नवे कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या आता ४ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. कोरोनामुळे देशात गेल्या चोवीस तासात ३०६ जणांचा बळी गेला. त्यामुळे या आजाराने मरण पावलेल्यांची एकूण संख्या आता १३ हजारांहून अधिक झाली आहे.देशामध्ये महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असून त्यानंतर तामिळनाडूमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. गेल्या चोवीस तासात तामिळनाडूमध्ये कोरोनाचे २३९६ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे तेथील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५६ हजारांपेक्षा अधिक झाली आहे. सध्या देशात १,६९,४५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पूर्णपणे बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या २,२७,७५६ आहे. एकूण रुग्णांपैकी ५५ टक्के लोक या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत.
CoronaVirus News : देशाला कोरोनाचे ग्रहण; रुग्णसंख्या ४ लाख
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 06:10 IST