शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
3
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
4
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
5
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
6
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
7
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
8
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
9
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
10
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
11
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
12
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
13
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
14
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
15
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
16
फायद्याची गोष्ट! स्टील-अ‍ॅल्युमिनियम की लोखंड? स्वयंपाकासाठी कोणती भांडी सर्वात बेस्ट?
17
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
18
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
19
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
20
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश

CoronaVirus News: कोरोनाचा आलेख खाली; भारतीयांची प्रतिकारशक्ती अधिक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 06:41 IST

देशातील अन्य काही भागांतही कोरोनाने सर्वोच्च पातळी गाठून झाली असण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : देशातील कोरोना विषाणूंच्या संसर्गाबद्दल एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. डॉ. गुलेरिया म्हणाले, देशातील काही भागांत कोरोनाने सर्वोच्च शिखर गाठले आहे असे सध्याच्या स्थितीवरून म्हणता येईल. मुंबई व अहमदाबाद या दोन शहरांमध्ये कोरोनाची सर्वोच्च पातळी येऊन गेल्याची शक्यता आहे. दिल्ली, मध्य मुंबई व अहमदाबादमध्ये सर्वोच्च शिखर गाठल्यानंतर तेथील साथीचा आलेख काहीसा खाली येऊ लागला आहे.

देशातील अन्य काही भागांतही कोरोनाने सर्वोच्च पातळी गाठून झाली असण्याची शक्यता आहे. मात्र काही राज्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या आता वाढताना दिसत आहे. तिथे कोरोनाचा सर्वोच्च स्तर गाठून रुग्णसंख्या कमी होत जाण्यास काहीसा वेळ लागू शकेल.इतर देशांच्या तुलनेत भारत आणि मध्य आशियाई देशांमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी आहे. कोरोनामुळे इटली आणि स्पेनमध्ये जे घडले आणि जे अमेरिकेत घडत आहे, ते भारतात घडलेले नाही, असेही डॉ. गुलेरिया यांनी सांगितले. भारतीयांमध्ये कोरोनाशी लढण्याची प्रतिकारशक्ती आपोआप तयार झाली असावी, भारतात कोरोनामुळे होणारा मृत्यूदर त्यामुळेच कमी झाला असावा, अशी शक्यता त्यांनी वर्तवली.

37148 नवे बाधित आढळले आहेत. त्यामुळे आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या ११ लाख ५५ हजार १९१ वर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार मागील २४ तासांत ५९७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील कोरोनाच्या बळींचा आकडा 28084 झाला आहे. मात्र मृत्युदर आता अडीच टक्क्यांहून काहीसा खाली आला असून, अन्य देशांच्या तुलनेत हा खूपच कमी आहे.

देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. एकूण 1155191 रुग्णांपैकी ७ लाख २४ हजार ५७८ जणांनी या संसर्गजन्य आजारावर मात केली आहे आणि आजच्या घडीला ४ लाख २ हजार ५२९ जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतdocterडॉक्टर