शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
3
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
5
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
6
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
7
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
8
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
9
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
10
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
11
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
12
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
13
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
14
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
15
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
16
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
17
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
18
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
19
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
20
बापरे! तब्बल ८८ कोटीला एक टॉयलेट सीट विकतोय 'हा' माणूस; अखेर इतकी महाग का आहे?

CoronaVirus News : देशात कोरोना चाचण्या कमी; १० लाखांमागे फक्त २००७

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 05:35 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : कटू सत्य हे आहे की, इतर देशांच्या तुलनेत भारत फार मागे आहे आणि त्याचा परिणाम असा की, कमी रुग्ण उघडकीस येत आहेत. कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या गुरुवारी १.१२ लाखांवर गेली, असे आरोग्य मंत्रालयातील सूत्रांकडून समजते.

नवी दिल्ली : भारतात कोरोना विषाणूची (कोविड-१९) बाधा होऊन दर दहा लाख लोकांमागे २.६४ मृत्यू असा दर २१ मे रोजी होता. जगात हा मृत्यू दर सगळ््यात कमी असावा. याशिवाय बाधित रुग्णांचे प्रमाणही युरोप, उत्तर अमेरिका, अफ्रिका आणि इतर देशांच्या तुलनेत दर दहा लाख लोकांमागे सगळ्यात कमी ८६ एवढे आहे. असे असले तरी तज्ज्ञ काळजीत पडले आहेत ते म्हणजे इतर देशांच्या तुलनेत भारतात चाचण्यांचे प्रमाण खूप कमी असल्यामुळे. येथे विकसित देशांचा विचार नाही.

एवढेच काय सगळे आफ्रिकन देश एकत्र केले तर त्यांनीही दर दहा लाख लोकांमागे २०८२ चाचण्या केल्या तर भारताने २१ मे रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडील (आयसीएमआर) माहितीनुसारदर दहा लाख लोकांमागे चाचण्या केल्या २००७. २१ एप्रिल रोजी भारताने ४.६२ लाख चाचण्या केल्या होत्या तर एक महिन्यानंतर त्याच्या सहापट म्हणजे २६.१५ लाख चाचण्या केल्या.

कटू सत्य हे आहे की, इतर देशांच्या तुलनेत भारत फार मागे आहे आणि त्याचा परिणाम असा की, कमी रुग्ण उघडकीस येत आहेत. कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या गुरुवारी १.१२ लाखांवर गेली, असे आरोग्य मंत्रालयातील सूत्रांकडून समजते.अनेक राज्ये ही एक तर पुरेशा चाचण्या करत नाहीत किंवा माहिती लपवून ठेवतात ही तज्ज्ञांची काळजी आहे. चाचणीची व्यवस्था (सिस्टीम) ही खूप त्रासदायक व बोजड करण्यात आली आहे की, खासगी चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळांना औपचारिकता पूर्ण करून चाचण्या घेणे खूप त्रासदायक झाले असे अहवाल सरकारकडे येत आहेत.

बºयाच खासगी प्रयोगशाळा त्यांच्या क्षमतेच्या फक्त २५ टक्के चाचण्या करत आहेत. दुसरे म्हणजे आयसीएमआरने रुग्णांची जर तयारी नसेल तर खासगी प्रयोगशाळांना चाचणी करण्यास मनाई केलेली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी, आयसीएमआरच्या नोडल अधिकाऱ्यांकडून परवानगी आणि औपचारिकता पूर्ण करण्याच्या प्रक्रियेमुळे निष्कर्षांना विलंब होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या