शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : खासगी लॅबमध्ये होणारी कोरोना चाचणी सदोष?, दोघांना कोरोना नसताना टेस्ट पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 02:36 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : खासगी लॅबच्या कार्यक्षमतेवर त्यामुळे प्रश्नचिन्ह लागले आहे. अर्थात, आयसीएमआरच्या यादीत ही लॅब आहे. मात्र, सदोष पद्धतीमुळे दोन्ही रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे.

नवी दिल्ली : कोणत्याही कारणास्तव कोरोनाची चाचणी करण्याच्या विचारात आहात? थांबा. ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण, गुरूग्राममध्ये दोघांना कोविड-१९ ची लागण झाल्याचा अहवाल खासगी लॅबने दिला; मात्र नोएडाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ बायोलॉजीमध्ये त्यांचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आला.खासगी लॅबच्या कार्यक्षमतेवर त्यामुळे प्रश्नचिन्ह लागले आहे. अर्थात, आयसीएमआरच्या यादीत ही लॅब आहे. मात्र, सदोष पद्धतीमुळे दोन्ही रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे.अनुक्रमे ३७ व ४६ वर्षीय पुरुषांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली. अर्थात सर्दी, खोकला, ताप असल्याने त्यांनी स्वत:च कोरोना चाचणीचा निर्णय घेतला. आयसीएमआरने निश्चित केलेल्या लॅबशी संपर्क साधून त्यांनी चाचणी केली. त्यांना कोरोना असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधल्यावर पुन्हा त्यांचे नमुने घेण्यात आले व दुसऱ्याच दिवशी त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. विशेष म्हणजे, एका खासगी कंपनीतील १८ जणांची चाचणी करण्यात आली. त्यातील हे दोन्ही कर्मचारी पॅझिटिव्ह असल्याचे सांगितल्याने कंपनीत अस्वस्थता पसरली. इतर कर्मचारी घाबरले. दोघा कर्मचाऱ्यांना कोविड सेंटरमध्ये भरती करण्यात आले. दुसºयाच दिवशीच्या चाचणीनंतर त्यांना खबरदारीसाठी होम क्वारंटाईनची सक्ती करण्यात आली आहे. गोपनीयता व अकारण घबराट निर्माण होऊ नये म्हणून कंपनीचे नाव प्रसिद्ध न करण्याची विनंती जिल्हा प्रशासनाने केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या