शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
2
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
3
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
4
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
5
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
6
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
7
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
8
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
9
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...
10
Bhai Dooj 2025: भाऊबीजेसाठी पार्लर ग्लो फक्त चार स्टेप मध्ये! तोही घरच्या साहित्यात, चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!
11
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
12
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
13
India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार?
14
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
15
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?
16
मृत्यूनंतरही घरात फिरतोय पत्नीचा आत्मा, अभिनेत्याने सांगितला अनुभव म्हणाला- "अचानक कापूरचा वास आला आणि..."
17
चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
18
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक
19
ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'

CoronaVirus News: वॉर्ड बॉयनं ऑक्सिजन सपोर्ट काढला; कोरोना रुग्णाचा तडफडून मृत्यू; घटना सीसीटीव्हीत कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 09:18 IST

CoronaVirus News: संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाल्यानं धक्कादायक प्रकार उघडकीस; रुग्णालय प्रशासनाकडून सारवासारव

शिवपुरी: देशातील कोरोना रुग्णांच्या आकडा महिनाभरापासून झपाट्यानं वाढत आहे. त्यामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाही आहेत. तर बऱ्यात राज्यांमध्ये ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. कोरोना संकटात माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय देणाऱ्या घटना समोर येत आहेत. तर कुठे याच्या अगदी उलट प्रकार पाहायला मिळत आहेत. मध्य प्रदेशातल्या शिवपुरी जिल्हा रुग्णालयात अशीच घटना घडली आहे. कोरोनाची दुसरी लाट कधी ओसरणार?, परिस्थिती नियंत्रणात कधी येणार? जाणून घ्याशिवपुरी जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनअभावी एका कोरोना रुग्णांचा अक्षरश: तडफडून मृत्यू झाला. रुग्णाची अवस्था गंभीर असल्यानं उपचारादरम्यान त्याचं निधन झाल्याचं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं. मात्र सीसीटीव्ही फुटेजमधून वेगळंच चित्र समोर आलं. रुग्णालयात मृत पावलेल्या रुग्णाचं नाव सुरेंद्र होतं. ते रात्री ११ वाजता त्यांचा मुलगा दीपकसोबत बोलताना दिसत आहेत.पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये देता येऊ शकते वेगवेगळी कोरोनाची लस? तज्ज्ञ सांगतात की....यानंतर थोड्या वेळानं दीपक निघून जातो आणि सुरेंद्र झोपी जातात. यानंतर तिथे एक वॉर्ड बॉय येतो. तो सुरेंद्र यांच्या बेडजवळ असलेला पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर काढून नेतो. त्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास सुरेंद्र तडफडू लागले आणि ऑक्सिजनअभावी त्यांचा मृत्यू झाला. माझ्या वडिलांना ऑक्सिजन न देण्यात आल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलानं केला. 'आधी माझ्या वडिलांना स्ट्रेचरदेखील मिळाला नव्हता. मी त्यांना पाठीवरून आयसीयूमध्ये घेऊन गेलो होतो,' अशी व्यथा दीपक यांनी मांडली. या प्रकरणात शिवपुरी वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर अक्षय निगम यांनी सारवासारव सुरू केली आहे. रुग्णाच्या शरीरातील हिमोग्लोबिनचं प्रमाण ६ ग्रॅमवर आलं होतं. त्यांना ऑक्सिजनची गरज नव्हती. त्यामुळेच नर्सच्या सांगण्यावरून वॉर्ड बॉयनं सुरेंद्र यांच्या बेडजवळील पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर काढला आणि तो दुसऱ्या रुग्णाला दिला, असं निगम यांनी सांगितलं. सद्या या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या