मुंबई: देशात गेल्या महिनाभरापासून कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्यानं वाढत आहे. कोरोना रुग्ण वाढीच्या वेगानं अनेक राज्यांमधील आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर असल्याचं चित्र आहे. भारतानं कोरोना बाधितांच्या संख्येत ब्राझीलला मागे टाकलं आहे. आता केवळ अमेरिकाच भारताच्या पुढे आहे. गेल्या आठवडाभरापासून देशात कोरोनाचे १ लाखहून अधिक रुग्ण सापडत आहेत. कोरोनाचा वेग धडकी भरवणारा आहे. याचा सर्वाधिक ताण आरोग्य यंत्रणेवर आला आहे.सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क घाला असं आवाहन वारंवार करूनही सर्वसामान्य नागरिक नियम धाब्यावर बसवत आहेत. सार्वजनिक ठिकाणी होत असलेल्या गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव वेगानं होत आहे. दररोज कोरोना बाधितांची धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. मात्र तरीही अनेक जण गरज नसतानाही घराबाहेर पडत आहेत. याबद्दल एका डॉक्टरनं नाराजी व्यक्त केली आहे. डॉक्टर दीपशिखा घोष यांच्या ट्विटवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. हजारो लोकांनी त्यांचं ट्विट लाईक केलं आहे.
CoronaVirus News: ...तर तुम्हीच माझ्या जागी कोविड युनिटमध्ये जा; डॉक्टरच्या ट्विटनं सारेच हेलावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 08:20 IST