शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: धन्य ते यूपी सरकार, धन्य ते मोदीजी! भाजप आमदाराचा कोरोनानं मृत्यू; मुलाकडून सरकारचे वाभाडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 13:03 IST

CoronaVirus News: भाजप आमदार केसर सिंह गंगवार यांचं कोरोनानं निधन; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहूनही बेड मिळाला नाही

लखनऊ: देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. त्यातच, एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनामुळे परिस्थिती गंभीर बनली असून भाजपा आमदार केसर सिंह गंगवार यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सत्ताधारी पक्षातील आमदाराला २४ तास ICU बेड मिळाला नसल्याची माहिती मिळत आहे. आता, या आमदारांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. १८ एप्रिल रोजी त्यांनी हे पत्र लिहिलं होतं.लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो कशाला? माजी प्राध्यापकाची तक्रार; लस घेण्यास स्पष्ट नकारकोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशनच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. मात्र याच दरम्यान रुग्णालयात बेड्स आणि ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या आमदारालाही वेळेत बेड न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी रुग्णालयात असताना केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल झालं आहे. त्यामध्ये, आपल्याला बेड मिळावा, अशी मागणी त्यांनी केली होती.  मृत्यूनंतर भाजपा आमदाराचं पत्र व्हायरल, आरोग्यमंत्र्यांकडे मागितली होती मदतकेसर सिंह गंगवार यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा विशालनं एक फेसबुक पोस्ट लिहून सरकारबद्दल रोष व्यक्त केला. 'हेच का उत्तर प्रदेश सरकार? त्यांना आपल्याच आमदारावर उपचार करता येत नाहीत. मी कित्येकदा मुख्यमंत्री कार्यालयाला फोन केले. पण कोणाची टाप आहे फोन उचलण्याची. धन्य ते यूपी सरकार, धन्य ते मोदीजी!' अशा शब्दांत विशाल यांनी सरकारबद्दल संताप व्यक्त केला. त्यांच्या फेसबुक पोस्टची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

१८ एप्रिलला गंगवार कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. सुरुवातीला त्यांना बरेलीच्या राममूर्ती मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण, त्यांना २४ तासांपर्यंत एक आयसीयू बेड मिळाला नाही. काही दिवसांपूर्वीच त्यांना नोएडातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. मात्र, १८ एप्रिल रोजीच या आमदारांनी डॉ. हर्षवर्धन यांना पत्र लिहून परिस्थिती कळवली होती. तसेच, मला बेड उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणीही केली होती.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपा