शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

CoronaVirus News : बंगळुरू २0 दिवस बंद ठेवा : कुमारस्वामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 03:58 IST

राज्य सरकारने बंगळुरूमध्ये लॉकडाऊन लागू करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केली आहे.

बंगळुरू : कोरोनाच्या वाढत्या प्रादुभावामुळे काही ठिकाणे सील करण्याऐवजी कर्नाटकची राजधानी असलेले बंगळुरू शहर पुढील २0 दिवसांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात यावे. त्यासाठी राज्य सरकारने बंगळुरूमध्ये लॉकडाऊन लागू करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केली आहे.काही वस्त्या, इमारती वा झोपडपट्ट्या सील केल्याने कोरोनाचा फैलाव थांबेल, अशा भ्रमात राहून चालणार नाही. त्याऐवजी संपूर्ण शहरांत लॉकडाऊ न लागू करावा आणि त्याबरोबरच गरिबांना सरकारने तातडीने आर्थिक मदत करावी. अन्यथा त्यांचे हाल होतील, असे कुमारस्वामी यांनी म्हटले आहे. लोकांच्या जीवाशी सरकारने खेळू नये. तुम्हाला लोकांच्या जीवाची खरोखरच काळजी असेल, तर बंगळुरू शहरातील सर्व व्यवहार २0 दिवसांसाठी बंद करणे, हाच खरा उपाय आहे. अन्यथा बंगळुरूची अवस्था ब्राझीलप्रमाणे झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही माजी मुख्यमंत्र्यांनी सरकारला दिला आहे. गेल्या काही दिवसांत ब्राझीलमध्ये कोरोनाने थैमान घतले असून, तिथे रुग्ण आणि मृत्यू यांचे प्रमाण वाढत आहे. आम्ही ड्रायव्हर्स, धोबी, हातमाग कामगार यांना मदत करीत असल्याच्या घोषणा राज्य सरकार करीत आहे. पण त्यांना कोणतीही मदत अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे सुमारे ५0 लाख गरीब मजूर व बेकारांना ताबडतोबीने प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याकडे केली आहे.>कर्नाटकात आतापर्यंत ९३९९ रुग्ण आढळले असून, मरण पावलेल्यांची एकूण संख्या १४२ झाली आहे. बंगळुरू, कलबुर्गी, उडुपी, विजयपुरा, दक्षिण कन्नडा, चिक्कमंगळुरू, दावणगिरी, बागलकोट, बिदर या जिल्ह्यांत रोज रुग्ण आढळून येत आहेत. बंगळुरूच्या पाच भागांत १४ दिवसांसाठी निर्बंध लावण्यात आले आहेत. बंगळुरूमध्ये रुग्णांची संख्या अडीच हजारांच्या घरात आहे.

टॅग्स :kumarswamyकुमारस्वामी