शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: लॉकडाऊननंतर ३० टक्केच विमानसेवा सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 03:47 IST

पहिल्या टप्प्यात फक्त ३० टक्के विमानसेवा सुरू करण्याचा केंद्र सरकारचा विचार असून, प्रवासी व कर्मचारी यांनी सोशल डिस्टन्सिंगचे काटकोर पालन करण्यावर भर देण्यात येईल.

नवी दिल्ली : कोरोना साथीमुळे लागू केलेला लॉकडाऊन मागे घेतल्यानंतर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमानसेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात फक्त ३० टक्के विमानसेवा सुरू करण्याचा केंद्र सरकारचा विचार असून, प्रवासी व कर्मचारी यांनी सोशल डिस्टन्सिंगचे काटकोर पालन करण्यावर भर देण्यात येईल. त्यानुसार एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाने (एएआय) काही मार्गदर्शक तत्त्वेही तयार केली आहेत.पहिल्या टप्प्यात देशातील महत्त्वाच्या शहरांतून विमानसेवा पुन्हा सुरू केली जाईल. त्यामध्ये विविध राज्यांतील राजधानीची शहरे व महानगरे यांचा समावेश असेल. कोरोना साथीच्या सावटामुळे केंद्र सरकारने २२ मार्चपासून देशांतर्गत व २५ मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा स्थगित केली होती. देशव्यापी लॉकडाऊनची मुदत ३ मे रोजी संपणार असली तरी त्यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लॉकडाऊन कधी मागे घेतला जाईल व विमानसेवा पुन्हा कधी सुरू होते याकडे असंख्य लोकांचे लक्ष लागलेले आहे. एएआयने मार्गदर्शक तत्त्वांत म्हटले आहे की, एखाद्या विमानतळावर अनेक टर्मिनल असतील तर सध्याच्या काळात फक्त एकाच टर्मिनलचा वापर करणे योग्य ठरेल. विमानतळावर सामान वाहून नेणारे अनेक स्वयंचलित पट्टे असतील तर त्यांच्यापैकी काहींचाच आळीपाळीने वापर व्हावा. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग राखण्यास मदत होईल.लॉकडाऊन हटविल्यानंतर विमानसेवा पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास काही काळ जावा लागेल. तोपर्यंत प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन विमानतळावरील स्टॉलवर मर्यादित प्रमाणातच खाद्यपदार्थ ठेवावेत. सार्वजनिक वाहतूक सेवा, खासगी वाहतूक सेवा नीट सुरू असल्यास प्रवासी, कर्मचाऱ्यांना विमानतळावर पोहोचणे सुलभ होईल. त्याची विमानतळ प्रशासनाने वेळोवेळी खात्री करून घ्यावी.>खासगी कंपन्याही घेणार काळजीदेशभरातील १०० विमानतळांच्या देखभालीची व्यवस्था एअरपोर्ट आॅथॉरिटी आॅफ इंडियाकडे आहे. मात्र दिल्ली, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद या शहरांतील विमानतळांची व्यवस्था खाजगी कंपन्यांकडे आहे. दिल्ली व मुंबई विमानतळाची देखभाल करणाºया अनुक्रमे जीएमआर ग्रुुपची डीआयएएल कंपनी व जीव्हीके ग्रुपच्या एमआयएएल कंपनीने म्हटले आहे की, विमानतळावर रांगेमध्ये दोन प्रवाशांमध्ये दीड मीटरचे अंतर ठेवले जाईल. विमानतळावर तात्पुरते क्वारंटाइन केंद्र उभारण्यात येईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या