नवी दिल्ली : देशभरात कोरोना रूग्णसंख्या घटत असताना राजधानी दिल्लीत मात्र संसगार्ची तिसरी लाट आली आहे. मंगळवारी दिल्लीत ६ हजार ७२५ नव्या रुग्णांची भर पडली. एका दिवसात सहा हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळण्याची ही पहिलीच वेळ असल्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील कोरोनाची तिसरी लाट सुरू असल्याचे मान्य केले. केजरीवाल म्हणाले, दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. ही वाढ संसर्गाची तिसरी लाट असू शकते. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. पंधरा दिवसांमध्ये आम्ही चाचण्यांची संख्याही वाढवली आहे. ते देखील एक कारण असावे. मंगळवारी कोरोनामुळे ४८ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत दिल्लीत कोरोनामुळे ६ हजार ६५२ जणांचा अंत झाला आहे. उपचारांविषयी केजरीवाल म्हणाले, खासगी रुग्णालयांमध्ये आयसीयू बेड्स कमी आहेत. आम्ही त्यासाठी दिल्लीकरांसाठी आरक्षित बेड्स तयार ठेवले होते. त्यावर उच्च न्यायालयाने स्थगिती आणली.
CoronaVirus News : पहिल्यांदाच दिवसभरात दिल्लीत ६ हजार रुग्ण; कोरोनाची तिसरी लाट - अरविंद केजरीवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2020 06:37 IST