शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४०%; मृत्युदर लाखामागे ०.२ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 06:10 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : भारतात लाखापेक्षाही जास्त जणांना कोरोनाची लागण झाली होती. आता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे पहिल्या लॉकडाऊनमध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अवघे ७.१ टक्के होते.

- टेकचंद सोनवणेनवी दिल्ली : सलग चौथ्या लॉकडाऊनचा अत्यंत चांगला परिणाम दिसत असून, देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता जवळपास ४० टक्क्यांवर पोहोचल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या अडीच महिन्यांपेक्षा जास्त कालावधीत आरोग्य यंत्रणांनी केलेल्या प्रयत्नांमुळे हे यश प्राप्त झाले आहे.

भारतात लाखापेक्षाही जास्त जणांना कोरोनाची लागण झाली होती. आता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे पहिल्या लॉकडाऊनमध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अवघे ७.१ टक्के होते. चौथ्या लॉकडाऊनमध्ये हे प्रमाण तब्बल पाचपट करण्यात भारताला यश आले. दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये ११.४२ टक्क्यांवरून तिसºया टप्प्यात दुपटीपेक्षा जास्त २६.५९ टक्क्यांवर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले होते.जगातील १५ देशांची एकत्रित लोकसंख्या भारताइतकी असून, तिथे ३६ लाख ४५ हजार रुग्ण आहेत. जागतिक महासत्ता असलेली अमेरिका यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. भारताने मात्र वेळीच उपाययोजना करून कोरोना प्रसार मर्यादित करण्यात यश मिळवले आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी सांगितले.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण असे वाढवलेलॉकडाऊनमध्ये अर्थव्यवहारावर निर्बंध आणताना आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांची पूर्तता देशात करण्यात आली. कोरोनाबाधितांवर उपचारासाठी तीन श्रेणीत रुग्णालयांची विभागणी करण्यात आली. रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसत असताना रुग्णांना होम क्वारंटाईन, दहा दिवसांनी घरी जाण्याची मुभाही दिली. जीवनशैलीतील बदलांमुळेही प्रतिकारशक्ती वाढली. उपचार सुरू असलेल्या ६१ हजार १४९ पैकी २.९४ टक्के रुग्णांना आॅक्सिजनपुरवठा केला जात आहे, तर ३ टक्के रुग्णांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले असून, ६.४५ टक्के रुग्णांना व्हेंटिलेटर लावण्यात आले आहे. लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपताना हे प्रमाण सरासरी ७० टक्क्यांवर जाण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत २५ लाख ३६ हजार १५६ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. बुधवारी दुपारपर्यंत १ लाख ७ हजार ६०४ नमुने तपासण्यात आले आहेत, अशी माहिती आयसीएमआरचे वरिष्ठ संशोधक डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिली.रुग्णसंख्येत दहा देशांच्या यादीत असूनही भारतात मृत्यूदर सर्वांत कमी आहे. स्पेनमध्ये सर्वाधिक २७.७ टक्के रुग्णांचा मृत्यू आतापर्यंत झाला. एक लाखामागे तेथे ५९ जणांचा मृत्यू झाला. भारतात हे प्रमाण एक लाख रुग्णांमागे ०.२ टक्का आहे. लोकसंख्येच्या बाबतीत तुल्यबळ असलेल्या चीनच्या दाव्यानुसार हे प्रमाण ०.३ टक्का आहे. अमेरिकेत दर लाखामागे ४५२, तर स्पेनमध्ये ४९६ जणांना कोरोना होतो. इटलीमध्ये ३७४, ब्रिटनमध्ये ३७१, जर्मनीमध्ये २११, फ्रान्समध्ये २१०, रशियात २०८, तुर्कीमध्ये १८३, इराणमध्ये १५०, ब्राझीलमध्ये ११५ संक्रमित आहेत. जगात हीच सरासरी ६२ आहे, तर भारतात एक लाख लोकांमागे ७.९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.0.3% आयसीयूतदेशात सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या61149 सध्या बाधित6147 रुग्ण10%हा आकडा आहे.43070ठणठणीत बरे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत