शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोनावर नवा उपचार, जीन सायलेन्सिंग तंत्र उंदरांवर यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 06:55 IST

Coronavirus News: कोरोनाविरोधात विविध लसी बाजारात आल्या असल्या, तरी आणखी काय उपाय करता येतील, यावर संशोधन सुरू आहे. जीन सायलेन्सिंग हे तंत्र त्यातलेच एक... 

कोरोनाची बला एकदाची टळावी, यासाठी सर्व जग झटून प्रयत्न करत आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या आजारापासून सुटका करून घेण्यासाठी संशोधनात गुंतला आहे. विविध लसी बाजारात आल्या असल्या, तरी आणखी काय उपाय करता येतील, यावर संशोधन सुरू आहे. जीन सायलेन्सिंग हे तंत्र त्यातलेच एक... 

कोणी केले संशोधन- ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकी शास्त्रज्ञांनी कोरोनावरील उपचारांसाठी एकत्रित प्रयत्न केले.- ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडस्थित ग्रिफिथ विद्यापीठाच्या मेंडीस हेल्थ इन्स्टिट्यूट आणि सिटी ऑफ होप अँड रिसर्च सेंटर यांनी क्रांतिकारी संशोधन केले आहे.- रिसर्च टीमचे प्रमुख नायजेल मॅकमिलन यांनी आरएनए तंत्राच्या साह्याने शरीरातील ९९.९ टक्के विषाणूंचे समूळ उच्चाटन करता येते, हे दाखवून दिले. 

प्रयोगात काय आढळले- उंदरांवर करण्यात आलेल्या प्रयोगातून फुफ्फुसात पसरलेला कोरोना विषाणूचा संसर्ग पूर्णत: नष्ट करता येत असल्याचे महत्त्वाचे निकष हाती लागले. - या प्रयोगामुळे केवळ कोरोनाच नव्हे तर भविष्यात अशा प्रकारचा कोणताही विषाणू वा त्याचा व्हेरिएंट यांच्यावर रामबाण उपचार करता येऊ शकतील, हे नक्की झाले आहे.

या तंत्राला जीन सायलेन्सिंग असे नाव असून त्याचा प्रयोग उंदरांवर करण्यात आला. 

जीन सायलेन्सिंग तंत्राविषयी - जीन सायलेन्सिंग तंत्राचा वापर १९९० च्या दशकातही करण्यात आला होता.- या तंत्राच्या वापराने विषाणूची जनुके नष्ट करता येऊ शकतात.-जीन सायलेन्सिंग तंत्राच्या साह्याने विकसित करण्यात आलेले औषध ४ अंश सेल्सिअस तापमानापर्यंत स्टोअर करता येऊ शकते.- या तंत्रज्ञानाने तयार करण्यात आलेल्या इंजेक्शनच्या मदतीने गंभीर रुग्ण चार ते पाच दिवसांत बरा होऊ शकतो, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे.- असे असले तरी सर्व चाचण्या पूर्ण होऊन बाजारात हे औषध येण्यासाठी किमान दोन वर्षे लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यscienceविज्ञान