शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

coronavirus: दिलासादायक! देशभरात कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत पुन्हा मोठी घट, दिवसभरात सापडले एवढे रुग्ण

By बाळकृष्ण परब | Updated: November 16, 2020 10:50 IST

CoronaVirus Positive News : गेल्या चार महिन्यांतील एका दिवसात सापडलेली सर्वात कमी रुग्ण संख्या आहे. यापूर्वी १५ जुलै रोजी देशात २९ हजार ४२९ रुग्णांची नोंद झाली होती.

ठळक मुद्देगेल्या २४ तासांत देशभरात सापडले कोरोनाचे ३० हजार ५४८ नवे रुग्ण देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या पोहोचली ८८ लाख ४५ हजार १२७ वर दिवसभरात देशात ४३५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील मृतांची एकूण संख्या १ लाख ३० हजार ०७० एवढी झाली

नवी दिल्ली - दिवाळीमुळे वाढलेली गर्दी, प्रदूषण, राजधानी दिल्लीमध्ये वाढत असलेली कोरोनाच्या रुग्णांची संख्या, देशात कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याची तज्ज्ञांकडून व्यक्त होत असलेली भीती, या पार्श्वभूमीवर ऐन दिवाळीत कोरोनाविरोधात देशासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये कमालीची घट दिसून आली आहे. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाच्या ३० हजार ५४८ नव्या रुग्णांची नोंद झाली. गेल्या चार महिन्यांतील एका दिवसात सापडलेली सर्वात कमी रुग्ण संख्या आहे. यापूर्वी १५ जुलै रोजी देशात २९ हजार ४२९ रुग्णांची नोंद झाली होती.आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या मादितीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ३० हजार ५४८ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ही ८८ लाख ४५ हजार १२७ वर पोहोचली आहे. तर गेल्या दिवसभरात देशात ४३५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील मृतांची एकूण संख्या १ लाख ३० हजार ०७० एवढी झाली आहे. 

तसेच गेल्या २४ तासांमध्ये देशभरात ४३ हजार ८५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे देशभरातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा हा ८२ लाख ४९ हजार ५७९ वर पोहोचला आहे. तर सध्याच्या घडीला देशात कोरोनाचे ४ लाख ६५ हजार ४७८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येतही सातत्याने घट होत असल्याने ही दिलासादायक बाब मानली जात आहे.दरम्यान, कोरोना व्हायरसने गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून भारतासह संपूर्ण जगभरात कहर केला आहे. कोरोना व्हायरसची लस कधी तयार होणार याकडे संपूर्ण जगभरातील लोकांचे लक्ष आहे. कोरोना व्हायरसपासून बचावासाठी संपूर्ण जगभरातील वैज्ञानिक आणि डॉक्टर प्रयत्न करत आहेत. अशा स्थितीत कोरोनाच्या संक्रमणाबाबत तसंच लसीकरणाबाबत एक  सकारात्मक माहिती समोर येत आहे.  कोरोनाबाधित रुग्णांची घटती संख्या पाहून एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी  देशात कोरोनाची लस येण्याआधीच भारतीयांना कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी लागणारी इम्युनिटी तयार होईल असा दावा केला आहे.दिल्लीप्रमाणेच भारतातील इतर राज्यात वाढत जाणारं प्रदूषण, दिवाळीची एकूण परिस्थिती पाहता कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.  याशिवाय थंडीमुळे पुन्हा एकदा  कोरोनाग्रस्तांचा आकडा वेगानं वाढू शकतो असं काही तज्ज्ञांचं म्हणणं असतानाच एम्सच्या डॉक्टरांनी केलेला दावा हा दिलासादायक ठरत आहे. कोरोनाबाबत माहिती देताना डॉ. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया  यांनी सांगितले  की, ''आपण ज्या प्रकारचा ट्रेंड पाहत आहोत. ते पाहिल्यानंतर आपण असे म्हणू शकतो की देशात कोरोनाची लस येण्याआधी भारतीयांची प्रतिकारशक्ती विकसित होऊ शकते. कोरोनाचे स्वरुप कदाचित बदलणार नाही.''

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याHealthआरोग्यIndiaभारत