शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: कोरोना निगेटिव्ह माता, जन्माला आले पॉझिटिव्ह बाळ; डॉक्टरांच्या पायाखालची वाळूच सरकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 20:06 IST

Corona Virus shocking News: उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये खळबळजनक प्रकार घडला आहे. बीएचयूच्या सर सुंदरलाल हॉस्पिटलमध्ये प्रसुतीसाठी भरती झालेल्या महिलेने कोरोनाबाधित मुलीला (born corona Positive) जन्म दिला आहे.

Varanasi News: उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये खळबळजनक प्रकार घडला आहे. बीएचयूच्या सर सुंदरलाल हॉस्पिटलमध्ये प्रसुतीसाठी भरती झालेल्या महिलेने कोरोनाबाधित मुलीला (born corona Positive) जन्म दिला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेला कोरोना झालेला नाही. तिची चाचणी निगेटिव्ह आली असली तरी देखील बाळ पॉझिटिव्ह जन्मल्याने कोरोनाचे हे रूप शास्त्रज्ञांनाही चकीत करून गेले आहे. डॉक्टरांनुसार सध्या आई, बाळ दोघांचीही प्रकृती चांगली आहे. (Pregnant women corona negative, gave birth corona positive child.)

चंदौलीची राहणारी सुप्रिया प्रजापति 24 मे रोजी बीएचयू हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. ऑपरेशनच्या आधी तिची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये ती निगेटिव्ह असल्याचे समोर आले. यानंतर डॉक्टरांनी तिची प्रसुती केली. तिला कन्यारत्न झाले. डॉक्टरांनी खबरदारी म्हणून नवजात मुलीची कोरोना चाचणी केली. यामध्ये तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने डॉक्टरांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. हा रिपोर्ट पाहून मेडिकल सायन्सशी संबंधित वैज्ञानिकही हैरान झाले आहेत. बीएचयु हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. के के गुप्ता यांनी सांगितले की, हॉस्पिटलमध्ये दाखल असलेली बाळ-बाळंतीन सुखरुप आहेत. आई कोरोना निगेटिव्ह आणि मुलगी पॉझिटीव्ह आल्याने त्यांची पुन्हा चाचणी केली जाणार आहे. 

बीएचयूचे जीवशास्त्राचे प्राध्यापक ज्ञानेश्वर चौबे यांनी सांगितले की, हा जगभरातील विचित्र प्रकार आहे. नवजात अर्भक कोरोना पॉझिटिव्ह आहे, परंतू तिची आई निगेटिव्ह आहे. अशा स्थितीत त्यांची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात यावी. अमेरिकेतही असा प्रकार झाला होता. दुसऱ्यांदा टेस्ट केल्यावर माता आणि बाळ निगेटिव्ह आले होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPregnancyप्रेग्नंसीdoctorडॉक्टरpregnant womanगर्भवती महिला