शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: मजुरांच्या मनात विश्वास निर्माण करण्याची गरज- नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 08:23 IST

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी मजुरांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. 

ठळक मुद्दे कोरोनाला थोपवण्यासाठी लॉकडाऊनही करण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्ये हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे प्रचंड हाल होत आहेत. अनेक मजुरांनी आपापल्या घरचा मार्ग धरला आहे. मजुरांना दिलासा देण्यासाठी केंद्राच्या स्तरावरून हरेक प्रयत्न सुरू आहेत. केंद्राबरोबरच इतर संघटनाही मजुरांच्या मदतीसाठी प्रयत्नशील असल्याचं नितीन गडकरींनी सांगितलं.

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचं थैमान वाढत आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी लॉकडाऊनही करण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्ये हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे प्रचंड हाल होत आहेत. अनेक मजुरांनी आपापल्या घरचा मार्ग धरला आहे. मजुरांना दिलासा देण्यासाठी केंद्राच्या स्तरावरून हरेक प्रयत्न सुरू आहेत. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी मजुरांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. 

मजुरांना दिलासा देण्याचे प्रत्येक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सरकारनं आपले धान्याचे कोठारही उघडले आहे. केंद्राबरोबरच इतर संघटनाही मजुरांच्या मदतीसाठी प्रयत्नशील असल्याचं नितीन गडकरींनी सांगितलं. आजतकचा खास कार्यक्रम ई-एजेंडामध्ये गडकरी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामण गरिबांसाठी उचललेल्या पावलांची सविस्तर माहिती दिली आहे. प्रवासी मजूर आतून घाबरलेले आहेत. मजुरांच्या मनात विश्वास निर्माण करायला हवा. परिस्थिती हळूहळू सामान्य होत असल्याचं त्यांना सांगावं लागणार आहे. 

देशाची अर्थव्यवस्थाही हळूहळू रुळावर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे पॅकेज दिलं आहे, ते अर्थव्यवस्थेच्या सुधारणेसाठी महत्त्वाचे आहे. गडकरी म्हणाले की, गरिबांना मदत करण्यासाठी 'वन नेशन-वन रेशन कार्ड' लागू केले जात आहे. जेणेकरून प्रवासी मजुरांना अन्नधान्य सहज अन्नधान्य उपलब्ध होईल. प्रवासी मजुरांचे काही फोटो  समोर आले आहेत, ते पायी आपापल्या राज्यांत जात असल्याचं दिसत आहे. मजुरांना समजवावं लागेल की, व्यवसाय सुरू होणार आहे. त्यांना रोजगार मिळणार आहे. तरीही एखाद्या मजुराला घरीच जायचं असल्यास त्याला सहीसलामत घरी पोहोचवं आवश्यक आहे. हे काम केंद्र आणि राज्य सरकारनं मिळून करणं आवश्यक आहे, असंही गडकरी म्हणाले आहेत.  

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीcorona virusकोरोना वायरस बातम्या