शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

Coronavirus: पुन्हा ‘बंद’कडे वाटचाल; कोरोना प्रादुर्भाव वाढत चालल्याने भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 08:23 IST

२४ तासांत १८,५५२ रुग्ण । बाधितांचा आकडा ५ लाख ८ हजार ९५३

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव ज्या वेगाने वाढत चालला आहे, त्यामुळे पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. देशात गेल्या २४ तासांत तब्बल १८ हजार ५५२ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आतापर्यंतच्या एकूण बाधितांचा आकडा ५ लाख ८ हजार ९५३ झाला आहे. देशात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात नवे रुग्ण आढळले आहेत. मृत्यूसंख्याही २४ तासांत ३८४ ने वाढल्याने एकूण आकडा १५ हजार ६८५ झाला आहे.

देशात रुग्णांची संख्या एक लाख होण्यास १०० दिवस लागले होते. पुढील ३९ दिवसांत रुग्णांची संख्या ५ लाखांवर गेली. म्हणजेच ३९ दिवसांत तब्बल ४ लाख रुग्ण वाढले. १ जून ते २७ जून या काळात वाढलेल्या रुग्णांची संख्याच ३ लाख १८ हजार ४१८ इतकी आहे. हा वेग असाच राहिल्यास पुढील शनिवारपर्यंत देशातील एकूण रुग्णांची संख्या ६ लाखांवर गेलेली असेल, असे दिसते.

या पाच लाखांपैकी १ लाख ५२ हजार रुग्ण महाराष्ट्रात असून, दिल्लीत ७७ हजार, तमिळनाडूमध्ये ७४ हजार आणि गुजरातमध्ये ३० हजार रुग्णसंख्या झाली आहे. उत्तर प्रदेशातही रुग्णसंख्या वाढून २० हजारांवर गेली आहे. याखेरीज सात राज्यांत रुग्णसंख्या १० हजारांच्यावर आहे. महाराष्ट्रात ७१०६, दिल्लीत २४९२, गुजरातमध्ये १७७१ तर तमिळनाडूत ९५७ जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातचा मृत्यूदर देशात सर्वाधिक आहे.

समाधानाची बाब ही की कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण देशात वाढत असून, ते ५८.१३ टक्के झाले आहे. आतापर्यंत २ लाख ९६ हजार ८८९ जण बरे होऊ न घरी परतले आणि सध्या १ लाख ९७ हजार ३८७ जणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे शनिवारी देण्यात आली.पुन्हा ‘बंद’कडे वाटचालरुग्णांमध्ये रोज प्रचंड वाढ होत असल्यामुळे रेल्वेसेवा १२ आॅगस्टपर्यंत, तर आंतरराष्ट्रीय विमानसेवा १५ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय झाला, हे उघड आहे. शाळा व महाविद्यालये कधी सुरू करायची, हे ठरवण्यात राज्यांना अडचणी येत असून, जवळपास सर्वच परीक्षा केंद्र व राज्य सरकार यांनी रद्द केल्या आहेत. याशिवाय सर्व मोठ्या शहरांत अनेक वस्त्या सील करण्यात आल्या असून, काही ठिकाणी तर पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याची मागणी सुरू झाली आहे. अनेक व्यापाऱ्यांनी स्वत:हून बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक