शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

Coronavirus: कोरोना विषाणूवरील लस १५ ऑगस्टपासून उपलब्ध करण्यासाठी हालचाली?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2020 4:41 AM

प्रयोगांसंदर्भातील प्रश्नांवर ‘आयसीएमआर’चे मौन

एस. के. गुप्ता नवी दिल्ली : कोरोना संसर्गावर स्वदेशात बनविलेली कोव्हॅक्सिन ही पहिली प्रतिबंधक लस स्वातंत्र्यदिनी, १५ आॅगस्टपासून उपलब्ध करून देण्याकरिता इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च या संस्थेने (आयसीएमआर) कंबर कसली आहे. पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ व्हायरॉलॉजी व भारत बायोटेक यांच्या सहकार्याने तयार होत असलेल्या कोव्हॅक्सिनच्या माणसांवरील चाचण्या ७ जुलैपासून सुरू कराव्यात असे पत्र आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी संबंधित बारा संस्थांना पाठविले आहे.

आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी या पत्रात म्हटले आहे की, कोरोना संसर्गावर प्रतिबंधक लस तयार करण्याचा देशाचा हा पहिलावहिला व महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्या चाचण्यांचे निष्कर्ष काय येतात याकडे केंद्र सरकारचे लक्ष आहे. कोव्हॅक्सिन लसीच्या माणसांवर चाचण्या करण्याच्या कामात सहभागी असलेल्या १२ संस्थांनी आपले प्रयोग जलद गतीने पार पाडावेत.

येत्या १५ आॅगस्टपासून ही लस उपलब्ध करून देण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे असे या संस्थांना कळविण्यात आले होते. या मानवी चाचण्या पार पाडण्याची जबाबदारी भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड (बीबीआयएल) या कंपनीकडे सोपविण्यात आली आहे.कोव्हॅक्सिन या लसीच्या माणसांवरील चाचण्या पार पाडण्यासाठी सक्रिय असलेल्या १२ संस्थांमध्ये दिल्लीच्या एम्सचाही समावेश आहे.एम्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आयसीएमआरने लसीच्या माणसांवरील प्रयोगांबाबत पाठविलेले पत्र एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांना मिळाले आहे. या चाचण्यांबाबत एम्सच्या संबंधित विभागात सविस्तर चर्चा होऊन मगच कामाला सुरूवात केलीजाईल.आरोग्य खात्याने आयसीएमआरकडे दाखविले बोट

  • कोव्हॅक्सिन लसीच्या माणसांवर फक्त सव्वा महिनाच चाचण्या होण्याची शक्यता आहे. त्यांचे निष्कर्ष १५ आॅगस्टपर्यंत हाती यावेत अशी अपेक्षा आयसीएमआरने व्यक्त केली आहे.
  • मात्र केवळ सव्वा महिन्याच्या चाचण्यांच्या बळावर ही लस सर्वांना कशी काय उपलब्ध करून देता येईल, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. त्या प्रश्नाचे उत्तर केंद्र सरकारकडे नाही व आयसीएमआरने याबाबत मौन धारण केले आहे.
  • आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी मानवी चाचण्यांबद्दल पाठविलेल्या पत्राबाबत केंद्रीय आरोग्य खात्याच्या सचिव डॉ. प्रीती सुदान यांनी सांगितले की, हे पत्र आयसीएमआरने लिहिलेले असल्याने हीच संस्था त्याबाबत अधिक काही सांगू शकेल.
  • या विषयावर कोणतेही भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांच्याशी या विषयाबाबत लोकमतने अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या