शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: कोरोनाच्या मुळावर हल्ला करण्यासाठी सरकार सज्ज; मेगा प्लान तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 08:50 IST

Coronavirus लॉकडाऊननंतरही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; सरकारची नवी रणनीती तयार

नवी दिल्ली: देशातील कोरोनाचं संकट दिवसागणिक गंभीर होत चाललंय. या संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. यातले जवळपास दोन आठवडे पूर्ण होत आले आहेत. मात्र गेल्या काही दिवसांत देशातल्या कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं वाढतेय. त्यामुळे आता सरकारनं कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे. कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्याची गरज अनेक दिवसांपासून वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत होती. त्यादृष्टीनं सरकारनं पावलं टाकण्यास सुरुवात केली असून आरटी-प्रोसेसच्या माध्यमातून दर दिवशी चाचण्यांची संख्या दुप्पट करण्याचा प्रयत्न आहे. आरटी-प्रोसेसच्या माध्यमातून सर्वात अचूक चाचण्या केल्या जातात. त्यामुळे याच पद्धतीचा वापर चाचण्यांसाठी करण्यात येणार आहे. सध्या आयसीएमआरच्या अंतर्गत काम करणाऱ्या लॅब्स दर दिवशी १० हजार चाचण्या करतात. पुढल्या ३ दिवसांत यांची संख्या दुप्पट करण्याचं ध्येय ठेवण्यात आलंय. पुढील काही आठवडे ही क्षमता आणखी वाढवण्यावर काम केलं जाणार आहे. उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्षयरोगाच्या चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या २५० ट्रूनॅट आणि २०० सीबी-नॅट यंत्रांचांदेखील संभाव्य कोरोना रुग्णांच्या चाचणीसाठी वापर करण्यात येईल. 'ट्रूनॅट आणि सीबी-नॅटनं एका दिवशी १२ चाचण्या केला जाऊ शकतात. आमच्याकडे रोशेची २ कोबॅस-६८०० यंत्रं आहेत. याशिवाय आणखी दोन यंत्रांच्या ऑर्डर्स देण्यात आल्या आहेत. या यंत्राच्या माध्यमातून दर दिवशी ५ हजार चाचण्या केल्या जाऊ शकतात,' असंदेखील त्यांनी सांगितलं.सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन चाचण्यांची संख्या वेगानं वाढवण्यासाठी रणनीती तयार करणार असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. आवश्यकता असलेल्या प्रकरणांच्या चाचण्या व्हाव्यात, यासाठी आरोग्य मंत्रालय आग्रही आहे. अनावश्यक चाचण्या करून यंत्रणेवरील ताण वाढवयाचा नाही, असं मंत्रालयानं अप्रत्यक्षपणे स्पष्ट केलंय.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या