शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : महसूल अधिकाऱ्यांनी दिलेल्या करवाढीच्या सल्ल्यामुळे मोदी सरकार संतप्त, दिले चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 08:43 IST

कोरोनाच्या फैलावामुळे आलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर FORCE नावाने एक 44 पानांचा अहवाल तयार करण्यात आल्याच्या वृत्तामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देसेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स विभागाने सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या या वृत्ताची चौकशी सुरू केली आहे. महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांनी दिलेला कारवाढीचा प्रस्ताव म्हणजे बेशिस्तपणा आहे.अशा प्रकारचा अहवाल तयार करणे हे आयआरएसचे काम नाही

नवी दिल्ली - लॉकडाऊनमुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून कारवाढीचा सल्ला दिल्याच्या वृत्तामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. दरम्यान सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स विभागाने सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या या वृत्ताची चौकशी सुरू केली आहे. 

देशात सुरू असलेल्या कोरोनाच्या फैलावामुळे आलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर FORCE नावाने एक 44 पानांचा अहवाल तयार करण्यात आल्याचा या वृत्तांमध्ये उल्लेख आहे. दरम्यान, केंद्र सरकारने सांगितले की, 'कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या महसुलात वाढ करण्यासाठी भारतीय महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांनी दिलेला कारवाढीचा प्रस्ताव म्हणजे बेशिस्तपणा आहे. अशाप्रकारचा कुठलाही अहवाल सरकारकडून मागवण्यात आला नव्हता. तसेच अशा प्रकारचा अहवाल तयार करणे हे आयआरएसचे काम नाही.' याप्रकरणी सीबीडीटीच्या अध्यक्षांनी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागवले आहे. त्यांनाच कर वाढवण्याचा अहवाल सोपवण्यात आला होता.  कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले  आहे. लॉकडाऊनमुळे देशातील सर्व आर्थिक व्यवहार बंद झाले आहेत. त्यामुळे सरकारला मिळणाऱ्या महसुलावर विपरीत परिणाम झाला आहे. घटलेले आर्थिक स्रोत आणि अर्थव्यवस्थेचा डोलारा सावरण्याचे आव्हान या पार्श्वभूमीवर भारतीय महसूल सेवेतील 50 अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांना पत्र लिहून या पत्राच्या माध्यमातून या अधिकाऱ्यांनी अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी काही शिफारशी केल्या होत्या. 

यामध्ये देशातील श्रीमंत लोकांवर कोविड कर म्हणून 40 टक्क्यांपर्यंत कर घेण्याचा सल्ला या अधिकाऱ्यांनी सरकारला दिला आहे. त्यामुळे ज्या लोकांचे उत्पन्न 1 कोटीपेक्षा जास्त आहे. त्यांच्यावरील कर 40 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात येऊ शकते. तसेच बऱ्याच वर्षांपूर्वी बंद झालेला संपत्ती कर पुन्हा सुरू करावा, 10 लाखांवर उत्पन्न असलेल्यांकडून 4 टक्क्यांपर्यंत कोविड-19 अधिभार घेण्यात यावा, असा सल्ला महसूल अधिकाऱ्यांनी दिला होता. 

तसेच गरिबांच्या खात्यात एका महिन्यात पाच हजार रुपयांपर्यंतची रक्कम थेट जमा करावी, आरोग्य क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्यांसाठी कर सवलत देण्यात यावी, असा सल्लाही या पत्राच्या माध्यमातून देण्यात आला होता. दरम्यान, भारतीय महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचा हा अहवाल म्हणणे म्हणजे अर्थ मंत्रालयाचे मत नसल्याचे सीबीडीटीने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारTaxकरEconomyअर्थव्यवस्थाcorona virusकोरोना वायरस बातम्या