शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: प्लाझ्मा, रेमडेसिविरची आरोग्य मंत्रालयाकडून शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 07:04 IST

औषधांच्या वापराबाबतचा प्रोटोकॉलही ठरवून देण्यात आला आहे.

मुंबई : प्लाझ्मा थेरपी आणि रेमडेसिवीर या अ‍ॅण्टीव्हायरल औषधाच्या ट्रायलबाबत साशंक असलेल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या दोन्ही औषधोपचारांचा वापर करण्याची शिफारस केली आहे. हायड्रोक्सिक्लोरोक्वीन (एससीक्यू) हे औषध केवळ उपचारांच्या पहिल्या टप्प्यातच द्यायचे असा बदलही या विभागाने सुचविला आहे. तसेच, या औषधांच्या वापराबाबतचा प्रोटोकॉलही ठरवून देण्यात आला आहे.कमी गंभीर लक्षणे असलेल्या ज्या रुग्णांवर स्टेरॉईडची मात्रा लागू पडत नसेल आणि त्यांची ऑक्सिजनची गरज वाढत असेल तर त्यांच्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर करणे संयुक्तिक ठरेल, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. हे बदल सुधारित क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉलचा एक भाग आहेत. एचसीक्यूचा वापर अतिदक्षता विभागात असलेल्या गंभीर रुग्णांसाठी करावा, असे सुरुवातीला सांगण्यात आले होते. मात्र, या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार एचसीक्यू जास्तीत जास्त प्रभावी ठरण्यासाठी ती उपचारांच्या पहिल्या टप्प्यावर आणि कमी गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना द्यावी, अशी शिफारस करण्यात आली आहे. एचसीक्यूमध्ये अ‍ॅझिथ्रोमाइसिन आहे. त्यामुळे त्याचा वापर अधिक सुरक्षितपणे करणे आवश्यक आहे. प्रभावी परिणामांसाठी रुग्णांवर शक्य तितक्या लवकर या औषधाचा वापर करावा. गंभीर आजाराने ग्रस्त रुग्णांना हे औषध देणे टाळले पाहिजे. तसेच, या औषधाचा वापर करण्यापूर्वी रुग्णांचा ईसीजी तपासावा, असेही या शिफारशींमध्ये नमूद केले आहे.औषधांच्या वापरानंतर जी काही निरीक्षणे आढळतात त्यानुसार हे निर्णय घेतले जातात. रेमडेसिविर हे अ‍ॅण्टीव्हायरल औषध सार्स आजारात काही प्रमाणात प्रभावी ठरले होते. परंतु, त्यामुळे शरीरात एका आठवड्यानंतर टॉसिलीझुमब तयार व्हायला सुरुवात होते. त्यामुळे या औषधाच्या वापराबाबत काही मतांतरे आहेत. ते औषध प्रत्येकासाठी उपयुक्त ठरेलच, असे ठामपणे सांगता येत नाही. त्यामुळे काटेकोरपणे वैद्यकीय देखरेखीखाली ते देण्याची गरज व्यक्त होत आहे. त्याशिवाय प्लाझ्मा थेरपी ही सर्व प्रकारच्या रुग्णांना उपयुक्त ठरणारी नाही. त्यामुळे या थेरपीच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र प्रोटोकॉल देण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या