शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: जाणून घ्या, कुठे आणि कोणती दुकाने उघडण्याची परवानगी?; केंद्रीय गृह मंत्रालयाचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 12:39 IST

केंद्रीय गृहमंत्रालयाने कोणत्या भागात दुकाने उघडण्याची परवानगी दिली त्याचं स्पष्टीकरण दिलं आहे

ठळक मुद्देदेशात कोरोना रोखण्यासाठी ३ मे पर्यंत लॉकडाऊन सुरु आहेशनिवारी गृहमंत्रालयाने ग्रामीण भागातील सर्व दुकाने उघडण्याची परवानगी दिली शॉपिंग मॉल्स आणि मार्केट कॉम्पेलेक्समधील दुकाने बंद राहणार

नवी दिल्ली – कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन सुरु आहे. आतापर्यंत देशात २४ हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर ७०० हून अधिक लोकांचा जीव गेला आहे. लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये यासाठी सरकारकडून आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान देशव्यापी लॉकडाऊनमध्ये शुक्रवारी दुकाने उघडण्याचा आदेश दिल्यानंतर शनिवारी केंद्रीय गृहमंत्रालयाने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

या स्पष्टीकरणामध्ये केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे की, कोणत्या प्रकारची दुकाने उघडली जातील आणि कोणत्या ठिकाणी उघडण्याची परवानगी दिली आहे. शुक्रवारी आदेश आल्यानंतर सरकारने सर्व प्रकारची दुकाने उघडण्याची परवानगी दिल्याचं सांगण्यात आलं त्यामुळे शनिवार या आदेशाबाबत केंद्र सरकारला स्पष्टीकरण द्यावं लागलं. गृह मंत्रालयाने शनिवारी सांगितले की, ग्रामीण भागातील सर्व दुकाने उघडण्याची परवानगी दिली आहे. फक्त तीच दुकाने बंद राहतील जी ग्रामीण भागातील शॉपिंग मॉलमध्ये असतील. त्याचप्रकारे शहरी भागातील एकमेव दुकाने, आसपासची दुकाने आणि निवासी संकुलांमध्ये असलेली दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

तसेच मार्केट, मार्केट कॉम्प्लेक्स आणि शॉपिंग मॉल्समध्ये असलेली दुकाने उघडण्यास परवानगी नाही. केवळ ई-कॉमर्स कंपन्यांना जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्याची परवानगी असल्याचं गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. त्याचसोबत दारु आणि अन्य वस्तूंच्या विक्रीवर बंदी आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये असलेल्या आदेशात दिलेल्यांना केंद्र सरकारच्या परवानगी दुकाने खुली करण्यात बंदी नाही. मात्र या सर्वांना सोशल डिस्टेंसिगचं पालन आणि सॅनिटायझेशनची पूर्ण काळजी घ्यावी असंही केंद्राने म्हटलं आहे.

आजपासून कोणती दुकाने उघडण्याची परवानगी

  • शहरातील गल्लीमध्ये असणारी दुकाने
  • रहिवाशी परिसरातील दुकाने
  • ई-कॉमर्सच्या सहाय्याने होणारी विक्री
  • ग्रामीण भागात असणारी सर्व दुकाने

 

ही दुकाने उघडण्याची परवानगी नाही

  • शहरातील मार्केट कॉम्पेलेक्स आणि शॉपिंग मॉल्समधील दुकाने बंद राहतील
  • शहरातील एकास एक लागून असलेली बाजारपेठेतील दुकाने
  • दारुची कोणतीही दुकाने उघडण्यास बंदी
  • ग्रामीण भागात येणाऱ्या मार्केट कॉम्पेलेक्स आणि मॉलमधील दुकाने बंदच राहणार  

 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

...म्हणून पुढील ४८ तास महत्त्वाचे; कोरोना प्रतिबंधक लसीची पहिल्यांदाच मानवावर चाचणी

ग्रामीण भागातील सर्व प्रकराची दुकाने उघडण्यास केंद्र सरकारची परवानगी

ग्रामीण भागातील सर्व प्रकराची दुकाने उघडण्यास केंद्र सरकारची परवानगी

‘या’ राज्यात १६ मे पर्यंत लॉकडाऊन वाढणार; सरकारच्या डॉक्टर समितीने दिले संकेत

व्वा! राज बाबू; वाईन शॉप सुरु करा, मनसेच्या मागणीवर शिवसेनेची खोचक भूमिका, सांगितलं...

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHome Ministryगृह मंत्रालय