शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: स्थलांतरित मजुरांना राज्यातच काम करण्याची केंद्राची मुभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 06:40 IST

‘लॉकडाउन’ संपेपर्यंत मजुरांना सध्या जेथे राहात आहेत त्या राज्यातून काहीही झाले तरी दुसऱ्या राज्यात जाता येणार नाही, असे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली : ‘लॉकडाउन’मुळे घराकडे परतताना मध्येच अडवून विविध राज्यांमध्ये निवारा शिबिरांमध्ये व्यवस्था केलेले स्थलांतरित मजूर त्यांच्या इच्छेनसार व कौशल्यानुसार उद्या सोमवार २० एप्रिलपासून त्याच राज्यांत रोजंदारीवर काम सुरु करू शकतील, अशी मुभा केंद्र सरकारने रविवारी दिली.‘लॉकडाउन’ संपेपर्यंत मजुरांना सध्या जेथे राहात आहेत त्या राज्यातून काहीही झाले तरी दुसऱ्या राज्यात जाता येणार नाही, असे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या मजुरांना मूळ गावी घरी जाता आले नाही तरी त्यांची रोजीरोटी काही प्रमाणात सुरु होऊ शकेल. केंद्राय गृहसचिव राजीव भल्ला यांनी यासंबंधीचा सुधारित आदेश सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना व केंद्रातील सर्व मंत्रालयांना पाठविला.नियमांचे पालन करावे लागेलकाम करू इच्छिणाºया मजुरांसाठी कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी बसची व्यवस्था व प्रवासातील त्यांच्या भोजनाची व्यवस्थाही स् ाानिक प्रशासनाने करायची आहे. बसच्या प्रवासात ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या नियमांचे व त्यांना काम देताना ‘लॉकडाऊन’ शिथिलीकरणासंबंधी १५ एप्रिल रोजी जारी केलेल्या मागदर्शिकेचे कठोरपणे पालन करावे लागेल.नोंदणी आवश्यकया मजुरांची व कोणाला कोणत्या प्रकारचे काम येते याची नोंदणी स्थानिक स्वराज्य संस्थांनी करायची आहे. यापैकी जे मजूर त्याच राज्यात पूर्वी काम करणारे असतील व त्यांना पुन्हा त्या कामावर जाण्याची इच्छा असेल तर त्यांना तेथे जाण्याची मुभा असेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या