शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: सौदी अरेबियात अडकले मराठी तरुण; दूतावासाकडून दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 00:57 IST

सौदी अरेबियात अडकलेल्या या दोन मराठी तरुणांसह इतर दोन राज्यांतील तीन तरुणांचाही समावेश आहे.

नवी दिल्ली : नोकरीसाठी गेल्या वर्षी सौदी अरेबिया येथे गेलेले दोन मराठी तरुण अडकले आहेत. कंपनीने त्यांना दोन महिन्यांचे वेतनही दिले नसून भारतीय दूतावासाकडूनही मदत मिळत नसल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले आहे.सौदी अरेबियात अडकलेल्या या दोन मराठी तरुणांसह इतर दोन राज्यांतील तीन तरुणांचाही समावेश आहे. प्रवीण कदम (पुणे), चिरंजीव गुप्ता (मुंबई), रक्षपाल सिंह (हरयाणा), अँथनी जोसेफ (केरळ), सेतू कृष्णा (केरळ) अशी या तरुणांची नावे आहेत.मूळचे पुण्याचे असलेले प्रवीण कदम यांनी व्यथा मांडल्या आहेत. ते म्हणाले की, गेल्या वर्षी एप्रिलमध्ये आम्ही पाच जण येथे आलो होता. कोरोनामुळे दोन महिन्यांपासून येथे लॉकडाऊन आहे. कंपनीकडून दोन वेळचे जेवण मिळते; पण वेतन दिलेले नाही. भारतीय दूतावासाला घरी जाण्यासाठी सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहोत. मात्र, त्यांच्याकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.कदम म्हणाले की, आमच्या कंपनीत अनेक देशांतून आलेले तरुण नोकरीला आहेत. फिलिपीन्सच्या दूतावासाने या कर्मचाऱ्यांना चार महिने पगारी सुटी देणार असल्याचे सांगितले आहे. कंपनीने आम्हाला घरी जाण्याची परवानगी दिली आहे. विमानसेवा सुरू झाल्यावर आम्हाला घरी पाठवण्यात येणार आहे. मात्र, आमच्या रखडलेल्या वेतनाबाबत कोणताही खुलासा केलेला नाही.नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्नभारतातील खासदार, मंत्री यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहोत. आम्हाला तातडीने भारतात येण्याची व्यवस्था करावी, अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या