शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: अन् ५०० रुपयांच्या नोटा फेकून ते धूम पळाले, गावात उडाली खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 18:26 IST

याप्रकरणी एसएचओ देवी यांनी सांगितले की, या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

हरियाणा - जगभरात कहर माजवणाऱ्या कोरोनाची दहशत आता गावापर्यंत पोहोचली आहे. सुरुवातीला सोशल मीडियावरील टिंगलटवाळीचा विषय बनलेला कोराना आता प्रत्येकजण गांभिर्याने घेत आहे. मात्र, कोरोनाबद्दल काही गैरसमज आणि अफवाही मोठ्या प्रमाणात पसरल्या आहेत. त्यामुळे, नागरिकांकडून कुठलीही रिस्क घेण्यात येत नाही. देशातील अनेक भागात नोटांद्वारे कोरोनाचा फैलाव करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे. हरयाणातील कैथल येथे काही लोकं आले अन् ५०० रुपयांच्या नोटा फेकून पळाले. या घटनेने गावांत खळबळ उडाली आहे. 

कैथलमधी वर्ण विहार परिसरातील एका झोपडपट्टी भागात शनिवारी रात्री ही घटना घडली आहे. नोटा फेकून धूम ठोकल्याचे समजल्यानंतर या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. याबाबत माहिती मिळताच, स्थानिक पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. त्यावेळी, या फेकून दिलेल्या नोटांची किंमत जवळपास १५ हजार रुपये एवढी आढळली. स्थानिक नागरिकांनी कुणीही या नोटांना हात लावला नाही, याउलट या नोटांवर वीटा ठेवण्यात आल्या होत्या. याप्रकरणी एसएचओ देवी यांनी सांगितले की, या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. तसेच, या नोटांना सॅनिटाईज केल्यानंतर त्या नोटा उचलण्यात आल्या. कोरोनाच्या भीतीमुळे कुणीही नोटा उचलण्याची हिंमत केली नाही, असेही देवी यांनी सांगतिले. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी गुरुग्राम जिल्ह्याच्या पटौदीतील गाव बलेवा येथे रस्त्यावर पडलेल्या पैशांमुळे गावात खळबळ माजली. बलेवा गावात चक्क रस्त्यावार ५००० रुपये पडले होते, त्यामध्ये १० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंतच्या नोटांचा समावेश होता. मात्र, या नोटांना हात लावायची किंवा खिशात घालायची हिंमतही कुणी केली नाही. देशात असलेल्या कोरोनाच्या संकटामुळेच नागरिकांमध्ये नोटा उचलण्यासाठी भीती दिसून आली. याबाबत माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन या नोटा हस्तगत केल्या. 

देशात कोरानाचे संक्रमण जाणीपूर्वक पसरविण्यात येत असल्याची चर्चा आणि अफवाही पसरत आहेत. त्यामुळेच, बलेगा गावात या नोटा उचलण्यासाठी कुणीही पुढे आले नाही. दरम्यान, पटौदी येथे कोरोनाचे काही रुग्ण आढळून आले आहेत. तसेच, पटौदी येथील तीन परिसरांना कंटनेमेंट झोन घोषित करण्यात आले आहेत. सध्या पोलिसांनी या नोटा हस्तगत केल्या असून खरंच हे पैसे जाणीवपूर्वक रस्त्यावर फेकले होते का, याचा तपास पोलीस करत आहेत. 

टॅग्स :Haryanaहरयाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या