शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: ...तर १० दिवसांमध्येच कोरोना रुग्णाला डिस्चार्ज; होम क्वारंटिनच्या नियमातही मोठा बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 12:17 IST

CoronaVirus Marathi News: केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून नव्या नियमांची माहिती

नवी दिल्‍ली: कोरोना रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देताना पाळण्यात येणाऱ्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून शनिवारी सकाळी याबद्दलची माहिती देण्यात आली. नव्या नियमांनुसार एखाद्या रुग्णामध्ये कोरोनाची लक्षणं दिसत नसल्यास आणि त्याची प्रकृती स्थिर असल्यास १० दिवसांमध्येही त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाऊ शकतो. डिस्चार्जनंतर रुग्णाला १४ दिवसांऐवजी ७ दिवस घरात क्वारंटिन करण्यात येईल. चौदाव्या दिवशी टेलि-कॉन्फरन्सच्या माध्यमातून रुग्णाची माहिती घेतली जाईल. कोरोनाची कोणतीही लक्षणं दिसत नसलेल्या किंवा अतिशय सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना कोविड केयरमध्ये ठेवण्यात येईल. त्यांच्या शरीराचं तापमान आणि हृदयाचे ठोके दररोज तपासले जातील. तीन दिवस ताप नसल्यास १० दिवसांनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल. त्यावेळी त्यांची चाचणी घेण्यात येणार नाही. डिस्चार्जनंतर रुग्णाला ७ दिवस होम क्वारंटिन राहण्याच्या सूचना देण्यात येतील. डिस्चार्जच्या आधी ऑक्सिजन सॅच्युरेशन ९५ टक्क्यांच्या खाली आल्यास रुग्णाला डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये (सीडीसी) ठेवण्यात येईल.कोरोनाची गंभीर लक्षणं असलेल्या रुग्णांना डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर्समध्ये ऑक्सिजन बेड्सवर ठेवलं जाईल. त्यांच्या शरीराचं तापमान आणि ऑक्सिजन सॅच्युरेशनचं प्रमाण नियमित तपासलं जाईल. रुग्णाचा ताप ३ दिवसांत उतरल्यास आणि त्याच्या शरीरातील ऑक्सिजन सॅच्युरेशनची पातळी ९५ टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास १० दिवसांत डिस्चार्ज देण्यात येईल. त्यावेळी रुग्णाला ताप, खोकला नाही ना, याची तपासणी केली जाईल. ताप, खोकला, ऑक्सिजनची गरज नसलेल्या रुग्णाची डिस्चार्ज देताना कोणतीही चाचणी केली जाणार नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या