शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: धोका वाढला! देशातील ६४० पैकी 'इतक्या' जिल्ह्यांना कोरोनाचा विळखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 16:47 IST

CoronaVirus News: लॅन्सेट ग्लोबल हेल्थच्या अहवालानं चिंतेत वाढ; नऊ राज्यांमधील परिस्थिती अतिशय गंभीर

नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा १० लाखांच्या पुढे गेला आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या अतिशय झपाट्यानं वाढत आहे. त्यामुळे संपूर्ण देशाची चिंता वाढली आहे. त्यातच आता लॅन्सेट ग्लोबल हेल्थच्या अहवालामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे. लॅन्सेटच्या अहवालानुसार, भारतातील ९८ टक्के भाग कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. देशातील ६४० जिल्ह्यांपैकी ६२७ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याची आकडेवारी लॅन्सेटनं प्रसिद्ध केली आहे. अमेरिकेनंतर भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव अतिशय वेगानं वाढत असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.भारतातील कोरोनाचा फैलाव नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा स्तरावर योजना तयार करून त्यांची अंमलबजावणी आवश्यक असल्याचं लॅन्सेटनं अहवालात म्हटलं आहे. 'कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या भागांवर अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या भागांमध्ये योजनाबद्ध पद्धतीनं काम करण्याची गरज आहे. कोरोनाचा फैलाव वाढलेल्या भागांत लॉकडाऊन किंवा अन्य निर्बंध लागू करणं आवश्यक आहे,' असं लॅन्सेटनं अहवालात नमूद केलं आहे.भारत सरकारनं दिलेल्या आकडेवारीच्या आधारे लॅन्सेटनं अहवाल तयार केला आहे. जिल्ह्यांमधील कोरोना रुग्णांची संख्या, तिथली लोकसंख्या आणि आरोग्य सुविधांच्या मदतीनं अहवाल तयार करण्यात आला आहे. अहवालातील माहितीनुसार देशातल्या नऊ राज्यांमधील परिस्थिती चिंताजनक आहे. यामध्ये मध्य प्रदेश, बिहार, तेलंगणा, झारखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओदिशा आणि गुजरात यांचा समावेश आहे. ईशान्य भारतामधील स्थिती सध्या तरी चांगली आहे. सामाजिक, आर्थिक, स्वच्छता, आरोग्य सुविधा असे विविध निकष लक्षात घेऊन लॅन्सेटनं भारतातील कोरोना स्थितीचा अहवाल तयार केला आहे. भारताच्या ९ राज्यांमधील परिस्थिती अतिशय गंभीर असून त्यासंदर्भात तातडीनं पावलं उचलण्याची गरज लॅन्सेटनं व्यक्त केली आहे. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा धोक्याचा इशारा लॅन्सेटनं दिला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या